साक्री : जिज्ञासा ही नवनिर्मितीची व संशोधनाची जननी आहे. याच जिज्ञासेच्या जोरावर मानवाने विज्ञानाच्या माध्यमातून विविध शोध लावले़ ज्यातून सुखी जीवन निर्माण करुन मनुष्यप्राणी सर्वश्रेष्ठ जगज्जेता झाला़ असे विचार जळगाव विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ़ आऱ एस़ पाटील यांनी केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सीलेज बेसड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि विज्ञान प्रसार नवी दिल्ली यांच्या सहकार्याने साक्री येथील सी़ गो़ पाटील महाविद्यालयात आयोजित १०७ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयोजित बाल विज्ञान मेळाव्याच्या समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ़ पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ़ ए़ पी़ खैरनार होते.आपल्या समारोपाच्या भाषणात डॉ़ पाटील पुढे म्हणाले, वैज्ञानिक संशोधन हे सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया असून अशा उपक्रमांच्या माध्यमातून या संशोधनात अधिकची भर पडेल म्हणून त्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले. डॉ़ खैरनार यांनीही मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले़ डॉ़ राजेंद्र अहिरे यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ़ प्रीतम तोरवणेंनी अहवाल सादर केला. सुत्रसंचालन प्रा़ डॉ़ प्रकाश साळुंखे व आभार डॉ़ सचिन नांद्रे यांनी मानले़ मधमाशी पालनाचे फायदे याविषयी प्रा.डॉ.लहू पवार यांनी प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले.पी़ झेड़ कुवर, आऱ एम़ शेवाळे, डॉ़ एस़ एस़ पाटोळे, डॉ़ एस़ जी़ देसले, विजय हिरे, एस़ व्ही़ सोनवणे, डॉ़ डी़ एस़ चव्हाण, अभय यावलकर, डॉ़ एस़ सी़ बोरसे, डॉ़ सचिन नांद्रे, प्रा. एम. एच. शेख, डॉ. सुदाम चव्हाण, प्रा. सदाशिव वाघ, प्रा. सुनील पालखे, डॉ. नगराळे, प्रा. खैरनार आदींनी मार्गदर्शन केले.
जिज्ञासा ही संशोधनाची जननी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:19 PM