लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कर्जमाफीच्या निर्णयानंतर शासनाने दीड लाखाच्या आतील शेतकºयांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे वर्ग करावेत. तसेच दीड लाखाच्यावर कर्ज घेतलेल्या शेतकºयांना ओटीएसची सवलत देऊन सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्टÑीयकृत बॅँकांना दिले. त्यासाठी शासनाने ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती. परंतु, राष्टÑीयकृत बॅँका शेतकºयांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याने शेतकºयांना त्रास होतो आहे. परिणामी, संतप्त शिवसैनिकांनी शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की, शिवसेना पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आंदोलन व शेतकरी संपामुळे सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजनेंर्तगत ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा झाली. त्यासाठी जिल्हा बॅँकेसह राष्टÑीयकृत बॅँकाकडून थकबाकीदार शेतकºयांची आकडेवारी मागविली. ही माहिती संकलित केल्यानंतर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅँक व राष्टÑीयकृत बॅँकांना शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ३१ मार्चपर्यंत दीड लाखाच्या आतील शेतकºयांच्या कर्जमाफीचे पैसे वर्ग करायचे होते. तसेच दीड लाखाच्यावर ओटीएसची सवलत देऊन शेतकºयांना सहकार्य करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, राष्टÑीयकृत बॅँक शेतकºयांना सहकार्य करत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, माजी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख सतीश महाले, कैलास पाटील, डॉ. सुशील महाजन, नरेंद्र अहिरे, दिनेश पाटील, देवराम माळी, चंद्रकांत म्हस्के, रोहिदास माळी, प्रवीण पाटील, हेमराज साळुंखे, पंकज चौधरी, मुकेश खरात, प्रवीण पाटील, प्रभाकर देसले, अशोक गवळी, भिलेश खेडकर, संदीप शिंदे, दिगंबर जाधव आदी उपस्थित होते.
११ हजार शेतकºयांची माहिती अद्याप कळविलीच नाही धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने शासनाला २००९ ते २०१६ याकालावधित एकूण ५९ हजार १४८ थकबाकीदार शेतकºयांची यादी सादर केली. पैकी शासनाने जिल्हा बॅँकेला ४८ हजार ४२ शेतकºयांची पात्रता यादी कळविली. तसेच दीड लाखाच्या आतील थकबाकीदार ४३ हजार ६२ शेतकºयांच्या बॅँक खात्यात १११ कोटी ३ लाख रुपये वर्ग केले आहेत. उर्वरित ४ हजार ४९५ शेतकरी हे दीड लाखाच्यावर थकबाकीदार असल्याने त्यांना ओटीएसची सवलत दिली आहे. मात्र, त्यापैकी २ टक्के शेतकºयांना त्याचा लाभ घेतला आहे. उर्वरित ११ हजार १०६ थकबाकीदार शेतकºयांची पात्रता यादी शासनाने अद्याप जिल्हा मध्यवर्ती बॅँकेला कळविली आहे.
अधिकारी अनभिज्ञ शासनाने राष्टÑीयकृत बॅँकांना दीड लाखाच्या आत व त्यावरील थकबाकी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केली. आजपर्यंत कर्जमुक्तीच्या पैशाची आकडेवारी किती? ही भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. याबाबत लीड बॅँकेचे अधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडेही यासंदर्भात आकडेवारी उपलब्ध होत पाही. अशा परिस्थितीमुळे शेतकºयांना नाहक त्रास होत आहे.