धुळे सीईओंनी विस्थापित शिक्षकांना चर्चेसाठी बोलावलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 06:11 PM2018-06-04T18:11:37+5:302018-06-04T18:11:37+5:30
दालनाबाहेरच केली चर्चा : शिक्षकांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद प्रशासन गंभीर नसल्याची टीका
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषदेचे विस्थापित शिक्षक आज मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेत गेले. त्यासाठी त्यांनी तेथील कर्मचाºयांमार्फत निरोपही दिला होता. मात्र सीईओंनी शिक्षकांना दालनात बोलावलेच नाही. अखेर सीईओ बाहेर जात असतांना शिक्षकांनी त्यांच्याशी दालनाबाहेरच चर्चा केली. करतो, बघतो असे म्हणत सीईओ मार्गस्थ झाले..त्यामुळे विस्थापित शिक्षकांच्या पदरी निराशाच पडली.
जिल्ह्यातील संवर्ग १ व २ मध्ये काही शिक्षकांनी खोटी माहिती सादर केलेली आहे. अशा शिक्षकांची चौकशी करा, बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध कराव्यात, तसेच सीईओंनी आदेश देवूनही शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी खोटी माहिती देणाºया शिक्षकांचा अहवाल अद्याप सादर केला नाही. वरील तीनही गटशिक्षणाधिकारी ही बाब गांभिर्याने घेत नसल्याबद्दल धुळे तालुक्यातील ८-१० विस्थापित शिक्षक आज जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांना भेटायला गेले होते.
मुख्य कार्यकारी अधिकाºयांना भेटण्याची परवानगी मिळावी म्हणून त्यांनी रितसर शिपायामार्फत चिठ्ठी दिली. निरोप दिला. जवळपास अर्धातास शिक्षक सीईओंच्या दालनाबाहेरच टाटकळत होते. मात्र सीईओंनी शिक्षकांना दालनात चर्चेसाठी बोलावलेच नाही.
सीईओंना बाहेर जायाचे असल्याने, ते दालनाबाहेर पडले. त्याचठिकाणी विस्थापित शिक्षकांनी त्यांना गाठून आपले म्हणणे मांडले. अवघ्या दोन-तीन मिनीटात करतो, बघतो, प्रकिया सुरू आहे, अजून काहीच फायनल झाले नाही असे म्हणत ते मार्गस्थ झाले...
यावेळी भास्कर अमृत सागर, गोकूळ पाटील, विजय भोई, ज्ञानेश्वर बोरसे, नगराज सोळंके, मुकेश कोळी, संजय साळुंके, प्रफुल्ल शिंदे,वैशाली चव्हाण, अर्चना पवार, कविता पवार आदी उपस्थित होते.