धुळ्यात उद्या विद्यापीठस्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:03 PM2019-10-02T12:03:00+5:302019-10-02T12:03:25+5:30
पाटील महाविद्यालय : सहभागी होण्याचे आवाहन
आॅनलाइन लोकमत
धुळे : झेड. बी.पाटील महाविद्यालयातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव पातळीवर आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ३ आॅक्टोबर २०१९ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारत सरकार व्यापक स्वच्छता मोहीम राबवत आहे. या मोहिमेचे औचित्य साधून स्पर्धेसाठी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी एक स्वच्छता दूत’ हा विषय देण्यात आलेला आहे. स्पर्धेत एका महाविद्यालयातील स्पर्धेसाठी प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १५५० रुपये, एक हजार, ९५०रूपये ७०० रुपये, तसेच दोन उत्तेजनार्थांना पारितोषिक देण्यात येणार आहेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पातळीवर प्रतिष्ठित समजली जाणारी ही स्पर्धा संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिलेल्या देणगीतून चालवली जात. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांच्यासह उपप्राचार्य व शिक्षकांनी केले आहे.