Vidhan Sabha 2019: जागा व तिकिट वाटपावरुन युतीतील इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:04 PM2019-10-02T13:04:03+5:302019-10-02T13:15:52+5:30

राजेंद्र शर्मा।  लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  जिल्ह्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी आता भाजप - शिवसेनेमध्ये  तिकिट ...

Disappointment among coalition aspirants over the allocation of seats and tickets | Vidhan Sabha 2019: जागा व तिकिट वाटपावरुन युतीतील इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर

Vidhan Sabha 2019: जागा व तिकिट वाटपावरुन युतीतील इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर

Next

राजेंद्र शर्मा। 
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  जिल्ह्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी आता भाजप - शिवसेनेमध्ये  तिकिट न मिळालेल्या इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे. काही इच्छुक विचार विमर्शासाठी आपल्या समर्थकांच्या बैठकीसुद्धा घेत आहे. दरम्यान, धुळे ग्रामीण मतदारसंघात तिकिट मुलाने मागितले पण भाजपने त्यांच्या आईला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांची लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांच्यात होईल, हे स्पष्ट झाले आहे.
धुळे जिल्ह्यातील पाचपैकी धुळे ग्रामीण, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या जागा भाजपकडे आहे. त्यात  शिंदखेडा येथून विद्यमान आमदार व मंत्री जयकुमार रावल आणि धुळे ग्रामीण मधून ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांचे नाव निश्चित झाले आहे. साक्री आणि शिरपूर येथील उमेदवारांची नावे दुस:या यादीत जाहीर होणार आहे. तर सेनेच्या वाटयाला धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा आली आहे. याठिकाणचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. जागा वाटपानंतर भाजप आणि शिवसेनेमधील इच्छूक उमेदवारांच्या नाराजीने डोके वर काढले आहे.
दरम्यान, धुळे ग्रामीणची जागा भाजपला सुटल्याने शिवसेनेतर्फे या मतदारसंघात गेल्या पाच वर्षापासून सतत कार्यरत  व इच्छूक जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांचे तिकिट कापले गेल्याने ते नाराज आहेत. याशिवाय भाजपमधील इच्छूक भाजप किसान सेलचे रामकृष्ण खलाणे आणि माजी जि.प.सभापती प्रा.अरविंद जाधव हे सुद्धा नाराज झाले आहे. आता यांची नाराजी दूर करण्यासाठी भदाणे कुटुंबियांना मेहनत घ्यावी लागणार आहे.
शिरपूर -   या जागेवर माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे कट्टर समर्थक व सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार काशिराम पावरा यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जात आहे. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नाही. कदाचित दुस:या यादीत ते येईल. परंतू त्यांच्या प्रवेशानंतर तालुक्यातील भाजपतर्फे इच्छूक उमेदवार डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्या समर्थकांनी नाराजी  व्यक्त केली आहे. यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी उशीरार्पयत  शिरपुरला त्यांच्या समर्थकांचा  मेळावा सुरु होता. मेळाव्याला भाजपचे तुषार रंधे, राहूल रंधे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित आहे. बैठकीत कार्यकत्र्याचे विचार ऐकल्यानंतर  पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर होईर्पयत ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.
साक्री - या जागेवर भाजपतर्फे कोणाला उमेदवारी मिळते, हा उत्सुकतेचा विषय आहे. कारण येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार डी.एस. अहिरे यांनीे उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये प्रवेश केला नाही. येथील काँग्रेसचे प्रमुख नेते माजी जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते आणि त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन दहिते हे लवकरच आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासोबत भाजप प्रवेश करणार आहे. त्यामुळे मतदारसंघात भाजपचे वर्चस्व वाढणार आहे. 
शिंदखेडा - येथून भाजपतर्फे विद्यमान आमदार व राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्याविरोधात कोण उमेदवार उभा राहणार याबाबतच काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत सुरु असलेला घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार कोणाचा करावा, अशा गोंधळात आहे. येथून राष्ट्रवादीतर्फे संदीप बेडसे, ज्ञानेश्वर भदाणे, सतीष पाटील तर काँग्रेसतर्फे शाम सनेर यांचे नाव आघाडीवर आहे.
धुळे शहर- धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्यामुळे येथून भाजपमधील इच्छूक उमेदवारांची घोरनिराशा झाली आहे. भाजपकडून येथून महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, डॉ.माधुरी बाफना, रवी बेलपाठक आणि हर्षल विभांडीक यांची नावे चर्चेत होती.  सेनेतर्फे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांचे नाव गेल्या काही दिवसापासून आघाडीवर होते. त्यांच्यानंतर माजी महानगर प्रमुख सतीश महाले, डॉ.सुशिल महाजन, युवा सेनेचे पंकज गोरे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र या सर्व चर्चाना मंगळवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला असून सेनेतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांना एबी फॉर्म मिळाला   आहे.
 

Web Title: Disappointment among coalition aspirants over the allocation of seats and tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.