धुळे : येथील जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेमध्येच १ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले़ जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात सहायक कनिष्ठ लिपीक पदावर असलेला विलास मधुकर पाटील याने शिरपूरच्या एका ग्रामसेवकाकडून लाच मागितली होती़ या ग्रामसेवकाला भविष्य निर्वाह निधीतील कर्ज प्रकरण मंजूर करायचे होते़ त्यासाठी विलास पाटीलने त्याच्याकडून लाच मागितली़ तक्रारदार ग्रामसेवकाने या प्रकरणाची तक्रार धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ तक्रार दाखल होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करीत सापळा लावला आणि लिपिक विलास पाटील याला १ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडण्यात आले़
धुळ्यात लाचखोर लिपीक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 4:12 PM