अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काचे घरकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:02 PM2019-09-14T23:02:10+5:302019-09-14T23:02:27+5:30
महापालिका । विशेष महासभेत होणार निर्णय
धुळे : सर्वासाठी घरे २०२० या धोरणाची प्रभावी अंमलबजासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्राच्या खाजगी जमिनीवरील अतिक्रमन धारकांना हक्काचे घरकुल मिळण्यासाठी महापालिकेकडून तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे़
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फेत ११ सप्टेंबर २०१९ अन्वये शासन निर्णय पारीत झालेला आहे़ त्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मालकीच्या अखत्यारित जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करून अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्याबाबत शासनाने १७ सप्टेंबर २०१८ रोजीच्या आदेशान्वये पट्टवाटपाच्या संदर्भात मार्गदर्शन सुचना निश्चित केल्या आहेत़ त्यानुसार मनपा स्तरावरून कार्यवाही सुरु केल्या आहे़ त्यासाठी महापालिकेची विशेष सभेत निर्णय घेतला जाणार आहे़
घोषीत, अघोषीत झोपडपट्या लाभ
सर्वसामान्य नागरिकाचे घरकुलाचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी १७ नोव्हेबर २०१८ च्या केंद्र शासनच्या निर्णयानुसार सरकारी जागेवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार ग्रामपंचायत व महापालिका हद्दीतील अतिक्रमण धारकांची माहीती जमा करण्यासाठी खाजगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे़ सध्या शहरात ३९ शासकीय जागेवर (घोषित झोपड्या) आहेत़ तर १९ अघोषित झोपड्या, ७ फुटपाथवरील झोपडपट्या, ६० कॉलनी, नगर व विविध भागातील झोपडपट्या आहेत़
सर्व्हेनंतर मिळणार हक्क
सर्र्वांसाठी घरे २०२० पर्यत सर्व बेघर कुुटुंबांना घर देण्याची महत्वकांशी मोहिम हाती घेण्यात आली आहे़ शहरातील घोषित, अघोषित, गावठाण जागा तसेच अतिक्रमीत जागेची ड्रोनव्दारे मोजणी केली जात आहे़
नियमाकुल जागेवरील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे़ महापौर चंद्रकांत सोनार यांनी मंगळवारी १७ विशेष सभा आयोजित केली आहे़ सभेत शहरातील बेघरांना घरकुलाचा लाभ मिळवुन देण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे़ घरकुला बाबत चर्चा हाऊन निर्णय घेतला जाणार आहे़ अशी माहिती भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली़