कानुबाई मातेची थाटात स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:29 PM2019-08-04T22:29:00+5:302019-08-04T22:29:15+5:30

विविध ठिकाणी उत्सव : रात्रभर जागरण व विविध कार्यक्रमांचे आयोजन आज होणार विसर्जन

Establishment of Kanubai Mother | कानुबाई मातेची थाटात स्थापना

मालपुर ता.शिंदखेडा येथे रविवारी सायंकाळी कानुमातेची  पारंपरीक पद्धतीने स्थापना करण्यात या वेळी करण्यात आलेली आकर्षक सजावट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/मालपुर: खान्देशवासीयांचे आराध्य कुलदैवत असलेला  कानुबाई मातेची शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ठिकठिकाणी थाटात स्थापना करण्यात आली. या उत्सवासाठी सर्व भाऊबंदकीचे  नातेवाईक हे एकत्र येत असतात. 
   कानुबाई मातेचा उत्सव संपूर्ण खान्देशात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो़ एकत्र कुटुंब पध्दत काळाच्या ओघाने लोप पावत असली तरी या सणाला सारे भाऊबंद नातलग  आनंदाने परिवारासह एकत्र येत असतात हे या उत्सवाचे वैशिष्टच म्हणावे लागेल़
* अशी करतात स्थापना *
केळीच्या खांबाने मखर सुशोभित करून चौरंगावर तांब्याच्या कलशात सुपारी, पैसा-नाणे टाकून व सजवून त्यावर पारंपारीक नारळ ठेवून देवीचा शृंगार केला जातो़ अलंकारांनी सजवून देचील प्रिय असलेली फुले अर्पण करतात़ दुपारी विधीवत स्थापन करून सायंकाळी महानैवेद्य अर्पण करतात़ रोट-पोळी, गंगाफळाची भाजी, खीर अस    नैवेद्य कानुबाईला अर्पण केला जातो़ साखर, फुटाणे, लाह्या, काकडीच्या प्रसादाला महत्व  आहे़. महाआरती करून सायंकाळी  सर्व कुटुंबिय एकत्र प्रसाद ग्रहण करतात़ रात्री झिम्मा, फुगड्या, जागरण, गीत भजनाचा कार्यक्रम होतात़ दुसºया दिवशी  सामूहिकरित्या वाजत गाजत  जल्लोषात  कानुबाईचे विसर्जन करण्याची परंपरा आजही टिकून आहे़ शहरात पांझरा नदी पात्रात विर्सजन करण्यात  येत   असते.
*मालपुर येथे ही थाटात स्थापना आज सामूहिक विर्सजन*
मालपुर येथे  सकाळ पासुनच कानुबाई मातेच्या मातेचे स्थापना करण्याची लगबग दिसून आली़ संततधार पावसासह कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालायावेळी कानुबाई माता व कन्हेर राजाच्या घोषणांनी संपूर्ण गावच दणाणून गेले. 
रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ कानुबाई मातेच्या दर्शनासाठी घरोघरी फिरतांना दिसुन आली. यावेळी सगळेच अहिराणी, मराठी गाण्यांचा वेगवेगळ्या वाद्याचा गजर करतांना दिसुन आले. संपूर्ण रात्र  जागरण सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले़
आज सोमवारी सकाळी ९ वाजेपासुन विसर्जन मिरवणूकिला शनिमंदिर पासुन होणार सुरुवात. होणार असून संपूर्ण गावातून मिरवणूकी नतंर अमरावती नदीच्या संगमेश्वरा जवळ सामुहिक विसर्जन होणार आहे .

Web Title: Establishment of Kanubai Mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे