आत्मसंरक्षणार्थ मुलींना शस्त्र परवाना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:36 PM2019-12-06T12:36:06+5:302019-12-06T12:36:43+5:30
मुलींनी काढला मोर्चा : जिल्हा प्रशासनामार्फत राष्टÑपतींना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली मागणी
धुळे :मुलींवर होत असलेले अत्याचार व बलत्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी कायद्यात आवश्यक तरतूद करण्यात यावी. तसेच मुलीना आत्मसंरक्षणार्थ शस्त्र परवाना देण्यात यावा, अशी मागणी मोची चर्मकार समाज गुरू रविदासजी विचार मंचतर्फे जिल्हा प्रशासनामार्फत राष्टÑपतींना पाठविलेल्या निवदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान मुलींनी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मोर्चात लहान बालिकाही सहभागी झाल्या होत्या. यावेळी काळ्या पाटीवर लिहिलेल्या विविध घोषवाक्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेलते होते.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्यामार्फत राष्टÑपतींना निवेदन पाठविण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मुलींवर होत असलेल्या अत्याचार व बलत्काराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. या घटनांना पायबंद बसेल असा कायदा बनवावा. बलत्कार करणाऱ्यांना नपुसक करण्यात यावे. तसेच शासनाने मुलीचे जन्माचे स्वागत मुलगी जन्माला आल्या दिवशी तिच्या नावाने शस्त्र परवाना द्यावा. हैद्राबाद येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी.
निवेदनावर मानसी देवरे, रेणुका, पुष्पा साखरे, योगेश्वर चत्रे, गीता डोंगरे, कविता तेवारीकर, उर्वशी चत्रे, प्रेरणा चत्रे जागृती जपसरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.