हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 09:12 PM2020-09-24T21:12:33+5:302020-09-24T21:14:04+5:30

सततच्या पावसाचा खरीपांच्या पिकांना फटका : मंगळवारी झालेल्या पावसामुळे शेती शिवारांना आले तळ्याचे स्वरूप

The grass that came with the hands and mouth was cut off | हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने कहर केलेला आहे. मंगळवारी रात्री शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. नद्यांना पूर आला. मात्र सर्वाधिक नुकसान खरीप पिकांचे झालेले आहे. कापूससह ज्वारी, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. दरम्यान मंगळवारी सर्वाधिक पाऊस धुळे तालुक्यात झाल्याची नोंद आहे.
यावर्षी मृग नक्षत्रापासूनच समाधानकारक पाऊस होत आलेला आहे. त्यामुळे पिकांची स्थिती अतिशय चांगली होती. कोरोनाच्या काळात उत्पन्न चांगले येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यानंतर होत असलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरवले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या ४ व ५ तारखेला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे ज्वारी, मका, बाजरी, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. धुळे व साक्री तालुक्यातील एकूण १४४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधीत झाल्याचा कृषी विभागाचे म्हणणे आहे.
यातून बळीराजा सावरत नाही, तोच १९ सप्टेंबर रोजी जिल्हयातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. तर मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे खरीपाच्या आशा जवळपास संपुष्टात आलेल्या आहेत.
शिरूड परिरास सर्वाधिक नुकसान
धुळे तालुक्यातील शिरूड तालुक्यात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शिरूड भागात मंगळवारी सायंकाळी ७ ते साडेसात वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर रात्री नऊ पर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या शेतात ज्वारी, बाजरीची तोडणी झाली असून, कणसे काढण्याचे काम सुरू होते. मात्र पावसामुळे या कणसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळामुळे कपाशीच्या कैºया गळून पडल्या आहेत. अनेक शेतांमध्ये तलाव साचलेले आहेत. पाण्याचा निचरा कसा करावा असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा राहिलेला आहे. बोरी परिसरातील सुमारे ६० ते ७० गावांना मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे.
वडजाई
मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे पीके जमीनदोस्त झाली. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी सायंकाळी सायकाळी सहा ते सात वाजेदरम्यान वादळवाº्यासह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. तब्बल दोन ते अडीच तास झालेल्या पावसानमुळे कपाशी, सोयाबीन, बाजरी, आदि पिके वाº्यामुळे जमीनदोस्त झाली. अतिपावसामुळे कपाशी लाल पडली आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी सहाय्यक प्रिती भदाने सह तलाठी दत्तात्रय लहामगे यांनी शेतकºयांना सोबत घेऊन शेतात प्रत्यक्ष पाहणी केली. आदेश मिळताच पंचनामे सुरू करू असे त्यांनी सांगितले. सायंकाळी झालेल्या मुसळधार पाऊसात शेतकº्याचे खूप हाल झाले. नदी नाले तुडुब भरून वाहत असल्याने काही शेतकºयांना शेतातच मुक्काम करावा लागला. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकºयांना भरपाई मिळावी अशी मागणी कैलास बाविस्कर, संतोष देवरे, शरद देवरे, संजय जगदाळे , दिलीप देवरे, संजय महाराज, लोटने देवरे, प्रकाश देवरे, रामकृष्ण सुर्यवंशी आदींनी केली आहे.
विंचूर
बोरी व कान्होळी नदीच्या परिसरात शिरूड व बोरकुंड मंडळात गेल्या आठवड्यापासून सलग व मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने परिसर झोडपून काढला. ऐन काढणीच्या हंगामात कापुससह खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान झालेल्या पिक नुकसानीबाबत पंचनामा करण्यात यावा अशी मागणी शेतकº्यांनी केली आहे. े परिसरात जूनवणे,दोंदवाड, धामणगाव, विसरणे, विंचूर, चांदे, तरवाडे व विशेषता बोरकुंड परिसरात अधिकच पाऊस आल्याने शेतीच नुकसान झाले आहे. कापूस या नगदी पिकाचे उन्हाळ्यात मे च्या शेवटच्या आठवडयात लागवड केलेला कापुस पहिल्या च वेचणीचा कापुस मुसळधार पावसामुळे गळुन पडला. कैºयापण सडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पिक नुकसानीबाबत पंचनामा करण्यात यावा अशी मागणी संदिप देवरे, डॉ. अशोक पगारे, विंचूर माजी उपसरपंच जनार्दन देसल, बाबाजी देसले, भाऊसाहेब देसले, बोरकुंडचे सरपंच बाळासाहेब भदाणे, दोंदवाडचे माजी सरपंच हेमलता देवरे, ईश्वर पाटील आदींनी केली आहे.
मालपूर
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सायंकाळी दमदार पाऊसाने हजेरी लावल्याने शेतशिवारातुन परतीची वाट धरणाºया शेतकºयांसह मजुरांची देखील एकच धांदल उडाली. हा पाऊस रात्रभर सुरुच असल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र दिसुन आले.
सध्या येथील परीसरात कापुस वेचणीचे मुख्य काम सुरू आहे. दररोज पाऊस येत असल्यामुळे या पावसाची अवस्था अधिकच बिकट होत असुन दुसरीकडे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे मिळतील तेवढे मजुर घेवुन शेतकरी हातातोंडाशी आलेला घास घरादारात आणण्यासाठी धडपड करत आहे. सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने, वेचलेला कापुस झाकण्यासाठी तसेच घरात भरण्याच्या हालचालीची एकच धांदल उडाली. पावसामुळे कापुस बाजरी ज्वारी कांदा पिकाला याचा जोरदार फटका बसला आहे. रात्रभर पाऊसाच्या सरी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होत्या. याशिवाय कांदा पिकांच्या वाफ्यात सतत पाणी असल्याने पात पिवळी पडत आहे. तर बाजरी ज्वारी भुईसपाट झाल्यामुळे अखेर अस्मानी सुलतानी संकटाचा सामना दरवर्षी येथील शेतकº्यांना करावा लागत आहे.

Web Title: The grass that came with the hands and mouth was cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.