व्यसनाच्या साहित्याची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:23 PM2019-03-20T22:23:00+5:302019-03-20T22:23:41+5:30

शिंदखेडा : सत्यशोधक युवा मंचने राबविला प्रेरणादायी उपक्रम

Holi of addictive literature | व्यसनाच्या साहित्याची होळी

dhule

Next

शिंदखेडा : शहरातील सत्यशोधक युवा मंचतर्फे होळी सणाचे औचित्य साधून व्यसनांची करूया होळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी विद्यार्थी, युवकांच्या उपस्थितीत विविध गुटखा, जर्दा यांच्या पुड्या तसेच दारूच्या बाटल्यांचे रिकामे खोके या साहित्याची होळी केली.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. दिपक माळी यांनी मनोगताद्वारे उपस्थिताना मार्गदर्शन केले. तरुणांमध्ये विविध कारणांनी गुटका, बार, तंबाखू तसेच अन्य व्यसनी पदार्थ बिडी, सिगारेट यांचे सेवन व्यसनांमध्ये रूपांतरित होते. तसेच आजकाल बिअर दारू पिणे ही फॅशन बनली आहे. भविष्यात आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या या व्यसनांपासून युवकांनी दूर राहावे, असे आवाहन प्रा.माळी यांनी केले.
यावेळी प्रा.जितेंद्र पाटील तसेच नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, प्रा. अनिल माळी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश माळी, प्रवीण माळी, केशव माळी, मुकेश माळी, कुणाल जाधव, किशोर माळी, निवृत्ती वडिले, हरीश माळी , ईश्वर माळी, सुनील माळी, विनोद जाधव, नारायण माळी आदींनी परिश्रम घेतले. या वेळी अनेकांनी आपल्या व्यसनांचा त्याग केला.

Web Title: Holi of addictive literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे