घटस्फोटीतांचा आदर्श पुर्नविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:12 PM2019-12-14T23:12:38+5:302019-12-14T23:13:02+5:30
संडे अँकर । दोन्ही पोलीस पाटलांनी जुळवून आणला योग
शिंदखेडा : जुन्या चालीरीती व रुढी परंपरेला तिरांजली देत धनूर व फागणे येथील पोलिस पाटलांनी व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून घटस्फोटीत वधू-वरांचा परिचय देत एक आदर्श पुर्नविवाह जुळवून आणला. १२ डिसेंबर रोजी आशापुरीदेवी पाटण ता.शिंदखेडा येथे हा विवाह सोहळा पार पडला.
या विवाहात धुळे तालुक्यातील फागणे येथील पोलीस पाटील निता पाटील व धनूर येथील पोलीस पाटील संदेश पाटील यांनी महत्त्वाची भुमिका पार पाडली. वर व वधू दोन्ही घटस्फोटित असल्याने त्यांना एकमेकांना समजण्यासाठी एक महिना वेळ दिला गेला.
टाकळी प्र.दे. ता.चाळीसगाव जि.जळगाव येथील शेतकरी हिंमतराव रामराव सुर्यवंशी यांची कन्या वर्षा व तºहाडी ता.शिरपूर जि.धुळे येथील शेतकरी दिलीप टोंगल सोनवणे यांचा मुलगा निलेश यांचा हा विवाह आशापुरी देवी पाटण ता.शिंदखेडा येथे पार पडला. वर निलेश हा पदवीधर असून वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून नोकरीला आहे तर वधु वर्षाही पदवीधर आहे.