लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर व कडेला अवैधरीत्या वाहने उभी करण्याकडे कल वाढला आहे. मात्र चालक-मालकांच्या या बेशिस्तीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. नुकत्याच शहरातील मालेगाव रोडवर दुचाकीवरून जाणाºया विजयकुमार व चंदनबाला भंडारी यांच्या अपघातास रस्त्याकडेला बेदरकारपणे उभे केलेले वाहन कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत चंदनबाला यांचा नाहक ओढवलेला मृत्यू समाजमनाला चटका लावून गेला. शहरात कुठेही व अत्यंत बेशिस्तपणे वाहने उभी करून ठेवली जातात. बोकाळलेली ही अवैध पार्किंगच आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठली आहे. मात्र वाहतुकीचे नियमन करणाºया वाहतूक शाखेला याचे सोयरसूतक दिसत नाही. तसेच शहरात मनपाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. भंडारी दाम्पत्यास झालेल्या अपघातानंतर वाहतूक शाखेने यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई किंवा मोहीम उघडलेली नाही. त्यामुळेही नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मुख्य चौकांमध्ये नेहमीच मोठी वर्दळ असते. तरीही तेथे अशा पद्धतीने वाहने तासन्तास उभी केली जातात. तेथे जवळच उभे राहून वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतुकीचे नियमन करतात. परंतु तरीही त्यांच्याकडून या वाहनधारकांना मज्जाव केला जात नाही. ही वाहने येणाºया-जाणाºयांसाठी मोठा अडथळा ठरतात. त्यांच्यामुळे नित्य वाहतुकीची कोंडी होते. परंतु त्याचे कारण किंवा त्यावर उपाय शोधला जात नाही. प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या चौकांमध्ये उभी राहून प्रवासी घेतात. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर कारवाई करून आव आणला जातो. नंतर ती कारवाई निव्वळ ‘फार्स’ असल्याचे स्पष्ट होते. या अवैध पार्किंगमुळे पादचारी, दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतूक शाखेने परिणामकारक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
धुळ्यात अवैध पार्किंग सर्वसामान्यांच्या ‘जीवा’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:15 PM
शहर वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष : चंदनमाला भंडारींच्या मृत्यूने समाजमन अस्वस्थ
ठळक मुद्देमहापालिकेने वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात. आम्ही अवैध पार्किंगला आळा घालण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. नो पार्किंग झोनमध्ये अथवा चुकीच्या दिशेने वाहन उभे केले असेल तर आमचे कर्मचारी लगेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात. २०० रुपये त्यावाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था मनपानेच करावी. बेशिस्तीस आळा घातला गेला पाहिजे. नियमांची कडक अंमलबजावणी गरजेची आहे. अवैध पार्किंग होताच दंड किंवा शिक्षा व्हावी. नियम सर्वांना सारखेच असावेत.वाहतूक पोलीस व मनपा प्रशासन यांनी समन्वयाने काम करून शहरातील खुल्या, सोयीच्या जागांवर पार्किंगची व्यवस्था करावी. त्याची माहिती सर्वांना दिली जावी, जागृती करावी. पालकांनी मुलांना वाहने देताना नियमही शिकवावेत.