वकिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायद्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:10 PM2019-04-07T12:10:56+5:302019-04-07T12:11:48+5:30

वकिल संरक्षण कायदा अंमलात आणावा

 Independent law requirement for defense lawyers | वकिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायद्याची गरज

dhule

Next

देवेंद्र पाठक।
न्यायव्यवस्थेचा कणा हा वकील आहे़ पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड सुरु असताना काहीवेळेस वकीलांवर देखील हल्ले होत असतात़ अशावेळेस वकीलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे येतो़ परिणामी वकिलांच्या सुरक्षेसाठी शासनस्तरावरुन स्वतंत्र कायद्याची निर्मिती होऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहीजे़ यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप पाटील यांनी सांगितले़ त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला़
प्रश्न : वकील संघाच्या कार्यपध्दती संदर्भात काय सांगाल?
दिलीप पाटील : न्यायव्यवस्था आणि वकील यांच्यात समन्वय टिकविण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागते़ वकिलांच्या काही समस्या असल्यास त्यांचा योग्य रितीने पाठपुरावा करुन ते शासनदरबारी त्या मांडून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न होतो़
शासन निर्णय व्हावा, अपेक्षा
वकिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात सुरुवातीचे ५ वर्ष केवळ न्यायालयीन कामकाजाची पध्दत तसेच न्यायालयीन कामकाज शिकण्यात खर्च होतात़ त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांना मानधन देणे ही शासनाच्या हाती आहे़
आवश्यक त्याठिकाणी वकिलांमार्फत कामकाज झाले पाहीजे़ यासाठी शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे़ - अ‍ॅड़ दिलीप पाटील

Web Title:  Independent law requirement for defense lawyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे