धुळे जिल्ह्यात खोटी माहिती भरणाºया शिक्षकांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:39 PM2018-06-05T15:39:12+5:302018-06-05T15:39:12+5:30
मागणी : जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वयक समितीच्या पदाधिका-यांनी घेतली सीईओंची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये खोटी माहिती भरलेल्या शिक्षकांची त्रिस्तरीय समिती मार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वयक समितीच्या पदाधिकाºयांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्याकडे निवेनादनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की २१ मे रोजी समन्वय समितीने दिलेल्या पत्रानुसार आपण कारवाई केली असून त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने १६ खोटी माहिती भरणारे शिक्षक आढळून आले होते. त्याला समन्वय समितीने आक्षेप घेतला असता, त्यानुसार जिल्ह्यात खोटी माहिती भरणारे ४७ शिक्षक आढळले तरीसुद्धा अजून काही शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारींशी संगनमत करून माहिती लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करून खोटी माहिती सादर करणाºया शिक्षकांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे, बापू पारधी, जयश्री गावीत, रवींद्र खैरनार, संजय पोतदार, देवीदास महाले, भगवंत बोरसे, प्रमोद पाटील, शरद सूर्यवंशी, शिवानंद बैसाणे, अनिल तोरवणे, मिलिंद वसावे आदी उपस्थित होते.