शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

शेतातून अवैध गौणखनिज उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:13 PM

शेतकऱ्याची पोलिसांकडे धाव । चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी

साक्री : सरवडफाटा ते कोंडाईबारीपर्यंत होणाºया रस्त्याच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच या रस्त्यासाठी अनधिकृतपणे किती गौणखनिज वापरले गेले आहे, याच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ज्या शेतकºयांच्या शेतातून अनधिकृतपणे गौणखनिज उत्खनन झाले आहे त्या शेतकºयाने निजामपूर पोलिसांकडे धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.सरवड ते कोंडाईबारी या महत्वाकांक्षी रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे हे काम राज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतले असून या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम माती व दगडाची आवश्यकता असल्याने कंपनीने साक्री तहसीलदार यांच्याकडे गौणखनिजसाठी मागणी दाखल केली होती. त्यानुसार महसूल विभागाने विहीरगाव, वासखेडी, रोजगाव, जामकी, होडदाणे येथून ठराविक गटामधून गौणखनिज उत्खननास परवानगी दिली होती, असे असतानाही ठेकेदार कंपनीने काही गावगुंडांना हाताशी धरून शेतकºयांच्या शेतातून अनधिकृतपणे उत्खनन सुरू केले होते. त्यापैकी निजामपूर येथील पोपट गोटू वाणी यांच्या रोजगाव शिवारातील गट नंबर ८९/२ मधून चांगली माती काढून नेली आहे. शेतात आता फक्त दगड-धोंडे शिल्लक राहिले असून याविरोधात शेतकºयाने साक्रीच्या तहसीलदारांकडे तक्रार केली असता, त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही.त्यानंतर सदर शेतकºयाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे. याविषयी ‘लोकमत’ वृत्त दिल्यानंतर शासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. निजामपूर येथील तलाठी व सर्कल यांनी शेतजमिनीचा पंचनामा केला असून तसा अहवाल साक्री तहसीलदार यांना सादर केला आहे. यावर आता तहसीलदार काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान, यासंदर्भात शेतकरी भुषण पाटील यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावर पोलिसांनी तक्रार घेतली असून संबंधितांचे जाबजबाब घेण्याचे काम सुरू आहे. ज्या शेतकºयांची जमीन कंपनीने खोदून नेली आहे, त्यांनी सरवड ते कोंडाईबारी या रस्त्याचे जेवढे काम झाले आहे त्यासाठी कुठून गौणखनिज उपलब्ध केले आहे याची चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूक करण्याची मागणी लावून धरली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे