गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत रंगली जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:14 PM2019-04-07T12:14:46+5:302019-04-07T12:16:01+5:30

शोभायात्रेला चढला राजकीय रंग : पहिल्यांदा समितीचे दोन व्यासपीठ, एकावर भाजपा तर दुसऱ्यावर काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेनेचे पदाधिकारी

Jugal Bandi in Gudi Padva | गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत रंगली जुगलबंदी

dhule

Next

धुळे : दरवर्षी गुढी पाडव्याला हिंदू नववर्षानिमित्त शहरातून काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय नववर्ष स्वागत शोभायात्रेला यंदा लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय रंग चढला. शनिवारी सायंकाळी महात्मा गांधी चौकात सर्वपक्षीय समितीचे दोन व्यासपीठ उभारण्यात आले होते. एकावर भाजप उमेदवारासोबत भाजपाचे व सर्वपक्षीय समितीचे काही पदाधिकारी तर दुसºयावर काँग्रेस उमेदवारासोबत राष्टÑवादी, शिवसेना आणि सर्वपक्षीय समितीचे रवी बेलपाठक यांच्यासह अन्य काही पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील महात्मा गांधी चौकातील नारायण बुवा समाधीपासून शोभायात्रेला सुरुवात होणार असल्याने सर्वपक्षीय समितीतर्फे नेहमीप्रमाणे नारायण बुवा समाधीला लागून व्यासपीठ उभारण्यात आलेले होते. तर समितीच्या काही सदस्यांनी भाजपाने रस्त्याच्या दुसºया बाजुला जुन्या धुळेकडे जाणाºया रस्त्यावर दुसरे व्यासपीठ उभारण्यात आले होते.
सुरुवातीला सर्वपक्षीय समितीच्या पहिल्या व्यासपीठावर कार्यक्रमाला सुरुवात झाली. याठिकाणी समितीचे पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रवी बेलपाठक, काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील, राष्टÑवादीचे राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार प्रा.शरद पाटील, शिवसेनेचे अतुल सोनवणे, युवराज करनकाळ, नारायणबुवा समाधीचे मठाधिपती भाऊ रुद्र, महंत साळकर बाबाजी, ह.भ.प.धनंजय महाराज, पू.निलेश महाराज व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावरील महंत साळकर बाबाजी यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन सुरु असतांना समोरील व्यासपीठावरील माईकवरुन मोठ्या आवाजात गाणे सुरु होते. कार्यक्रम संपल्यावर मान्यवर व्यासपीठावरुन खाली आले. त्यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी त्याठिकाणी आले. त्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या हातात भगवा ध्वज दिला. त्यानंतर शोभायात्रा सुरु झाली.
शोभायात्रा थोडी पुढे गेल्यानंतर समितीच्या दुसºया व्यासपीठावर भाजपाचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, सर्वपक्षीय समितीचे पदाधिकारी विनोद मोराणकर, स्वागताध्यक्ष देवेंद्र सोनार, माजी महापौर जयश्री अहिरराव, हिरामण गवळी, १०००८ महामंडलेश्वर वैश्वनाथ महाराज, डॉ.माधुरी बाफना, भिकन वराडे आदी उपस्थित होते. दिप प्रज्वलन केल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी आधी त्या व्यासपीठावर असलेले माजी आमदार प्रा.शरद पाटील आणि अतुल सोनवणे हे भाजपा पदाधिकाºयासोबत सहभागी झाले.
एकच शोभायात्रा दोन गटात मागे - पुढे निघाली.रात्री उशीरापर्यंत शोभायात्रा सुरु होती. शोभायात्रेत रात्री आठ वाजेपर्यत आमदार कुणाल पाटील हे सहभागी होते.
एकविरादेवी पालखी सरळ दुसºया व्यासपीठाकडे
सालाबादाप्रमाणे शोभायात्रेत आई एकविरा देवी यांची पालखीही निघाली. पालखी जेव्हा देवपुरातून महात्मा गांधी चौकात आली तर ती पहिल्यांदा सर्वपक्षीय समितीच्या व्यासपीठाकडे जात असतांना तिला परस्पर रस्त्याच्या दुसºया बाजुला असलेल्या व्यासपीठाकडे नेण्यात आले. एकूणच चौकात रंगलेली राजकीय जुगलबंदीच्यावेळी त्याठिकाणी उपस्थित दोन बाजुच्या तरुण वर्गाने घोषणाबाजी केली. मात्र जे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांनी याठिकाणी राजकारण नको, असे म्हणत याबाबत खंत व्यक्त केली.

Web Title: Jugal Bandi in Gudi Padva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे