लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. गुरुवारी ४२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तब्बल ६५ दिवसानंतर ५० पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. २० जुलै रोजी ३७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत होती.२० जुलै नंतर ५० पेक्षा अधिक रुग्ण दररोज आढळू लागले होते. जुलैच्या अखेरीस १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. आॅगस्ट महिन्यात बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. आॅगस्ट मध्ये दैनिक बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. २५० पेक्षा अधिक रुग्ण दररोज आढळत होते. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, गुरुवारी ४२ अहवाल पॉझिटिव्ह आले तर धुळे शहरातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.गुरुवारच्या अहवालानुसार : जिल्हा रुग्णालय धुळे येथील ६४ अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले.जिल्हा कारागृह १, मोगलाई १, नगावबारी १, विजय पोलीस कॉलनी १, तुळशीराम नगर १, धनुर १, मेहेरगाव १,उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ५१ अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले.दोंडाईचा : राहुल नगर १, पटेल कॉलनी १, सिंधी कॉलनी १, आशीर्वाद अपार्टमेंट १, निमगुळ २, रामी १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ३९ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आले.थाळनेर १भाडणे साक्री येथील ३७ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले.मराठी शाळेजवळ, अस्थाने १, कोकले १, मेन रोड निजामपुर १महानगरपालिका पॉलिटेक्निक महाविद्यालय येथील ३९ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले.प्रोफेसर कॉलनी १, धनदाई नगर १, राजपूत कॉलनी १शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील २१ अहवालांपैकी २ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले. धुळे इतर : २खाजगी लॅब येथील ३२ अहवालापैकी १९ अहवाल पॉझिटिव्ह आले.जयहिंद कॉ २, वाखारकर नगर २, वल्लभ नगर २, जमनागिरी रोड १, भगवान हौ सौ साक्री रोड १, वसुंधरा कॉ १, प्रमोद नगर १, विद्यानागरी १, आनंद नगर १, श्रीकृष्ण नगर १, धुळे इतर १, वरखेडी १, मुडावड म्हळसर १, अजंदे १,पिंपळनेर २
६५ दिवसानंतर आढळले ५० पेक्षा कमी रुग्ण, गुरुवारी ४२ अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 8:59 PM