धुळे : राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण व देशव्यापी कृत्रिम गर्भधारन कार्यक्रमानिमित्त कृषी महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली़ यावेळी जिल्ह्याभरातील दीड हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता़ कार्यशाळेच्या उदघाटन मथुरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थेट प्रक्षेपणाद्वारे करण्यात आले़या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक मुसमाडे प्रमुख अतिथी डॉ. पंकजकुमार महाले, विवेक सोनवणे, डॉ. सुधाकर शिरसाठ, डॉ. पंकज रापतवार डॉ.एम.एस.महाजन, डॉ. धिरज कनखरे, श्रीराम पाटील उपस्थित होते़ कृषी विज्ञान केंद्रामार्फत पशुपालक, शेतकरी व युवकांना मार्गदर्शन करण्यात आले़ कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. अशोक मुसमाडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात संकल्पनेतून राबविण्यात येणाºया राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, देशव्यापी कृत्रिम गर्भधान कार्यक्रम हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अभियानाचा महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले़ राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, देशव्यापी कृत्रिम गर्भधान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनजागृती करणे गरज असल्याचे नाशिक पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. सुधाकर शिरसाठ यांनी सांगितले़डॉ. प्रशांत निकम यांनी कृत्रिम गर्भधारणा या विषयी मार्गदर्शन केले़ सुत्रसंचालन जगदीश काथेपुरी यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. दिनेश नांद्रे यानी केले. यशस्वीतेसाठी डॉ. पंकज पाटील, रोहित कडू, अम्रिता राऊत, स्वप्नील महाजन, स्वप्नाली कौटे, जयराम गावीत, बाळु वाघ, कुमार भोये, रमेश शिंदे, मधुसुधन अहिरे, यशवंत मासुळे, जीवन राणे यांनी परीश्रम घेतले.
पंतप्रधानांच्या थेट प्रेक्षपण; ेशेतकरी मेळाव्याचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 10:31 PM