साक्री तालुक्यातील कढरे शिवारात महिलेचा खून करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:55 PM2020-09-22T12:55:50+5:302020-09-22T12:56:01+5:30
संशयित आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडी, गुन्ह्याची दिली कबुली
आॅनलाइन लोकमत
निजामपूर (जि.धुळे) : साक्री तालुक्यात आमोदे जवळ कढरे गावचे शिवारात जंगलात नेऊन महिलेचा गळा आवळून खून करणाºया संशयितास निजामपूर पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. आनंदा अंकुश ठाकरे (वय-२५ वर्षे रा.छावडी ता.साक्री ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
निजामपुर पोलीस स्टेशनमध्ये मयत महिलेचा मुलगा रवी सुखदेव वल्हर याने फिर्याद दिली होती.त्यानुसार तो व त्याची आई संगीताबाई सुखदेव वल्हर हे नंदाणे येथुन १८ सप्टेंबर रोजी सकाळी त्याच्या बहिणीच्या गांवी नवागांव ता.साक्री येथे जात होते. लोणखेडी फाट्या जवळ एका अनोळखी मोटर सायकल चालकाने त्यांना निजामपुर येथे सोडून देतो असे सांगुन आमोदे गावातुन कढरे गावचे शिवारातील जंगलात घेवुन गेला. मुलास मोटर सायकल जवळ थांबवून तो खताच्या गोण्या बैलगाडीत टाकुन येतो असे सांगुन मुलाची आई संगीताबाईस सोबत घेवुन गेला.बराच वेळ झाल्यानंतर आरोपी एकटाच परत आल्याने मुलाने आई कोठे आहे असे विचारले असता संशयित आरोपीने रवीलाही बळजबरीन ेजंगलात नेले. स्वत:च्याअंगातील शर्टाने त्यास गळफास देवुन तो मोटर सायकलस्वार फरार झाला. परंतु सुदैवाने रवी त्यातून वाचला. याप्रकरणी निजामपूर पोलीस स्टेशनला अज्ञात मोटर सायकल चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
मुलाने नमुद केलेल्या वर्णनाचा व अनोळखी आरोपी व मोटर सायकल याचा शोध घेतला असता संशयीत आनंदा अंकुश ठाकरे (रा.छावडी ता.साक्री) यास मोटरसायकलसह ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. दरम्यान गुन्ह्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.
आरोपीस अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.