धुळे खड्ड्यांचे महानगर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 10:28 PM2021-01-24T22:28:03+5:302021-01-24T22:28:51+5:30

वाडीभोकर रस्त्याचे काम संथगतीने सुरू, दररोज नागरिकांना जावे लागते अपघाताला सामाेरे

The metropolis of pits .. | धुळे खड्ड्यांचे महानगर..

dhule

Next

चंद्रकांत सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : विकासाचे स्वप्न दाखवीत महापालिकेवर सत्तेवर आलेल्या भाजपची विकास कामे सध्या शहरभर सुरू आहेत. मात्र, सात महिन्यांनंतरही देवपुरातील वाडीभोकर रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने नागरिक अक्षरश: कंटाळले आहेत. त्यामुळे हे विकास काम नागरिकांच्या जिवावर उठलेले दिसून येत आहे.
वाडीभोकर रस्त्यावर गटारीच्या कामासाठी मध्यभागी खड्डा खोदण्यात आला आहे. खोदकाम करताना निघालेली माती रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आल्याने वाडीभोकरकडे जाणारा एका बाजूचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. काॅलनी भागातील सांडपाण्याची विल्हेवाट पाइपलाइन टाकली जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी चेंबर बनविण्यात येत आहेत. मात्र, रस्त्यापेक्षा चेंबरची उंची मोठी असल्याने हेच चेंबर आता नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. रस्त्यावर काम सुरू असल्याच्या सूचना लावण्यात आलेल्या नाहीत. काही ठिकाणी गटारीचे पाइप आडवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री या भागातील काही पथदिवे बंद पडल्यास या भागात अंधार होतो. त्यामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकल्याने अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मात्र, अधिकारी व लोकप्रतिनिधी समस्या सोडविण्यास अपयशी ठरत आहेत. 

Web Title: The metropolis of pits ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे