धुळे: कामावर जाणाऱ्या मोहन मराठे यांना पोलीस चौकशीसाठी घेऊन जाऊन तो पाच- सात पोलिसांचा कस्टडीत होता.त्याचा खून पोलिसांनीच केल्याचा आरोप करून पोलीस ठाण्याचे इंचार्ज व त्यांना घेऊन जाणारे पोलीस या विरोधात ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांनी आज येथे केली.
चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला मोहन मराठे यांचा बुधवारी संशयास्पद मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमिवर आमदार विनायम मेटे यांनी मयत मोहन मराठे यांचा आई व परिवाराची भेट घेतली. अत्यंत हलाखीची परिस्थितीत असलेल्या मोहन मराठे यांचा परिवाराला आमदार विनायक मेटे यांनी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली .
मेटे म्हणाले की, कुटुंबाचा आधार असलेल्या मोहन मराठे याचा पोलिसांनी खून केल्याचा आरोप केला. पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, व त्यांना नेणारे पोलीस यांचा विरोधात ३०२ खुनाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी. सीआयडी चौकशी तात्काळ पूर्ण करून त्याचे चार्जशीट लवकर दाखल करावे. जलद न्यायालयात खटला चालवून अॅड. उज्वल निकम सारखे निष्णात वकील शासनाने नेमावेत.गुन्हेगारांना कडक शिक्षा करावी अशी मागणी केली.
पालक मंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना आदेश देऊन तात्काळ पोलिसाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा.हेच निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहमंत्री अनिल देशमुख यांना देऊन गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची मागणी करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. मोहन मराठे याची आर्थिक परिस्थिती खराब असून आई व पत्नी अपंग आहे.तीन शाळकरी मुली आहेत. त्यामुळे आईस वृद्ध पेन्शन व पत्नीस विधवा पेन्शन मिळावी अशी मागणी केली आहे.