शुभारंभाच्या साखळी सामन्यात मुकूंद ज्वेलर्सचा संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 10:37 PM2021-01-24T22:37:27+5:302021-01-24T22:37:40+5:30
टी-२० क्रिकेट स्पर्धाचा दुसरा सामना बरोबरीत
शिरपूर : १७ वर्षे आतील साखळी क्रिकेट सामन्यात धुळे येथील मुकूंद ज्वेलर्सचा संघाने एकतर्फी विजय मिळविला तर दुसरा सामना बरोबरीत झाल्यामुळे सुपर ओव्हरमध्ये ००० संघ विजेता ठरला़
२४ रोजी तांडे येथील मुकेशभाई आर.पटेल सीबीएसई स्कूलच्या मैदानावर एस.व्ही.के.एम. टी-२० चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ झाला़ यावेळी श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते तसेच नवीन शेट्टी (मुंबई क्रिकेट असोसिएशनचे २०१३ ते २०१९ कालावधीतील मॅनेजमेंट कमिटी मेंबर व चेअरमन मार्केटिंग कमिटी मेंबर) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
शुभारंभाचा सामना एसव्हीकेएम रॉयल संघाविरोधात धुळे येथील मुकूंद ज्वेलर्स या संघात झाला़ नाणेफेक जिंकत एसव्हीकेएम रॉयल संघाने फलदांजी स्विकारली़ २० षटकांच्या सामन्यात ८ गडीबाद ११६ धावा केल्यात़ त्यात संघाचा कर्णधार संम्येक जगताप याने २ चौकार व २ षटकांच्या मदतीने सर्वाधिक २७ धावा करून गडीबाद झाला़ पहिल्याच षटकात २ चौकार मारून जोरदार सुरूवात केली़ मात्र त्यानंतर हा संघ गडगडला़ अनुराग सोनवणे १५ व मयुरेश पवार याने ११ धावा केल्यात़ मुकूंद ज्वेलर्सच्या संघाच्यावतीने रोहित साळवे याने ४ षटकात १७ धावा देत ४ गडीबाद केल्यामुळे एसव्हीकेएम रॉयल संघाला धावा कमी करण्यास रोखले़
प्रत्युत्तरात, मुकूंद ज्वेलर्सच्या संघाच्यावतीने जेहान शेख याने ५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३३ धावा करून बाद झाला़ त्यानंतर कर्णधार प्रतिक सोनवणे याने १७ धावांमध्ये १ चौकार व ४ षटकाच्या मदतीने ३३ धावा केल्यात तर अनुराग वाघ याने देखील सर्वाधिक ३८ धावा करून संघाला १३ षटकातच विजयी केले़ विजयी चौकार मारत १३़२ षटकात १ गडीबाद देवून १२१ धावा करून संघाला विजयी केले़ रॉयल संघाच्यावतीने निखील राजपूत याने ३ षटकात १ गडीबाद केला़
दुसरा साखळी सामना येथील आऱसी़पटेल फॉर्मसी मैदानावर झाला़ त्यात यज्ञ अबॅकस क्लासेस धुळे विरोधात सारथी फायटर्स धुळे यांच्यात झाला़ सारथी संघाने २० षटकात ७ गडीबाद १३३ तर अबॅकस संघाने १० गडीबाद करून १३३ धावा केल्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला़ मात्र सुपर ओव्हरमध्ये अबॅकस संघ विजेता झाला़
सर्व साखळी सामने तांडे येथील मुकेशभाई आर.पटेल सीबीएसई स्कूलच्या मैदानावर व येथील आऱसी़पटेल फॉर्मसी मैदानावर होणार आहेत़ २७ रोजी दुपारून उपांत्य सामने तर २८ रोजी दुपारी १२ वाजता अंतीम सामना तांडे येथील मैदानावर होणार आहे़