एकाच रात्रीतून ४५ बकऱ्या चोरून नेल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:11 PM2019-09-25T23:11:22+5:302019-09-25T23:11:39+5:30

मालपूर येथील घटना : साक्री पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ

One goat was stolen in one night | एकाच रात्रीतून ४५ बकऱ्या चोरून नेल्यात

dhule

Next

साक्री : आयुष्यभर काबाड कष्ट करून घाम गाळून मजुरी करून बकºया विकत घेतल्या त्यांना वाढवल्या तीच त्यांची आयुष्यभराची पुंजी असताना चोरट्यांनी एकाच रात्रीत त्यांच्या सर्व पंचेचाळीस बकºया चोरून नेले आहेत त्यामुळे मालपुर येथील दोन आदिवासी कुटुंब रस्त्यावर आले असून त्यांनी पोलिसात तक्रार देऊनही तक्रार दाखल न करता उलट त्यांना दम देऊन हाकलून लावण्याची घटना साक्री पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे.
मालपुर येथील भिला रामदास बागुल व दादाजी रामदास बागुल या दोन आदिवासी कुटुंबाच्या ४५ बकºया होत्या २४ चा रात्री भिल्ल वस्ती जवळ असलेल्या वाड्यांमध्ये त्या बांधलेल्या होत्या अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून या सर्व बकºया एका वाहनांमधून चोरून नेले आहेत सकाळी पाहिल्यावर सर्व बकºया गायब असल्याने त्यांनी साक्री पोलिसात धाव घेतली व आपली कैफियत मांडली पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता मोठ्या साहेबांना भेटायचे सांगितल्यावर त्यांनी पोलिस निरीक्षक अजय चव्हाण यांची भेट घेतली
उपासमारीची वेळ
आयुष्यभराची कमाई चोरट्यांनी चोरून नेल्याने दोन्ही कुटुंबावर आजच उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले़
पोलिसांकडून देखील अन्याय
सर्वसामान्यांच्या न्यायासाठी असलेले पोलिस जर गरिबांच्या बाबतीत असे वागत असतील तर या गरीब कुटुंबाने कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे़ गंभीर गुन्हा घडलेला असतांनाही पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असती तर चोरटे सापडू शकले असत़े
कारवाई करण्याची मागणी
घटनेची दखल न घेता उलट ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना दमबाजी करण्याचा प्रकार साक्री पोलिसांनी केल्याने संबंधित पोलिस अधिकारी व व फिर्याद घेण्यास टाळाटाळ करणाºया दोषी पोलीस कर्मचाºयावर त्वरित कारवाई करण्याची मागणी मालपुर येथील ग्रामस्थ तसेच एकलव्य आदिवासी संघटनेने केली आहे
आम्हाला आता बकºया शोधण्याचे काम बाकी होते !
साक्री पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी तक्रारदाराची कैफियत ऐकून न घेता तुमच्या बकºया तुम्हाला सांभाळता येत नाहीत का पोलीस रिकामटेकडे आहेत का पोलिसांना फक्त बकºया शोधण्याचे काम बाकी आहे का असे सांगून तक्रारदार बंधूना साक्री पोलिस स्टेशन मधून हाकलून लावले़ त्यामुळे दोन्ही बंधू घाबरून घराकडे परत आले़ सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे म्हणणाºया पोलिसांनी चोर सोडून संन्याशाला फाशी या उक्तीप्रमाणे आपली वर्तणूक केली जात असल्याचा प्रकार बुधवारी घडला़

Web Title: One goat was stolen in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे