धुळे/शिरपूर : श्रावण महिण्याला सुरवात झाली असून रविवारी पहिल्या सोमवारच्या व नागपंचमी या दुहेरी औचित्याने पूर्व संध्येला शहरातील मंदिरांमध्य पहाटेपासूनच महाअभिषेक व आरती य साठी तयारी करण्यात आली आहे. पहिल्या श्रावण सोमवारी शिवशंकराला तांदळाची शिवामूठ वाहण्यात येते़ श्रावण सोमवारी उपवासाला महत्व असल्याने बाजारात उपवासाच्या पदाथार्ना विशेष मागणी होती. मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता चोख व्यवस्था करण्यात आली आहे़ बाजारत पूजा साहित्याला विशेष मागणी दिसून आली व्रतवैकल्याचा मानला जाणारा श्रावण महिना आणि सणाच्या निमित्ताने केली जाणारी भगवंताची पूजा आणि त्यासाठी वापरण्यात येणाºया पांढरी शेवंती, पांढरा धोतरा फूल व बेलपान व बेलफळ श्रावण मासाच्या औैैचित्याने विक्रीसाठी उपलब्ध झाली असून मागणी वाढली आहे़ या वर्षी पाऊस असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे़शिरपूर तालुका - शहरातील अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पाताळेश्वर महादेव मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान असून ते जागृत देवस्थान असल्याचे सांगण्यात येते. या मंदिरात अभिषेक करणाºयांची खूपच गर्दी असते. या मंदिराचे आधुनिकीकरणाचे काम झाले आहे़ शिरपूर- शहरातील करवंद नाकाजवळील साईबाबा कॉलनीतील मॉ चामुंडा माता मंदिराच्या प्रांगणातील महादेव मंदिरात अभिषेक करणाºयांनी मोठी गर्दी केली आहे़ मंदिर दक्षिणात्य पद्धतीने आकर्षक बांधण्यात आले आहे़ याच मंदिराच्या पाठीमागे चामुंडा माता व हनुमानचे मंदिर आहे़ या मंदिरातील सर्व मुर्त्या राजस्थानातील जयपूर येथून शिल्पकाराकडून बनविण्यात आल्या आहेत. लोकवर्गणी व समाजबांधवांनी केलेल्या दातृत्वाने हे मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या आवारात निमवृक्षाची वनराई असल्याने येथील वातावरण अतिशय प्रसन्न व मनमोहक वाटते. श्रावण महिन्यात या मंदिरात अभिषेक करणाºयांची मोठी गर्दी असते़अनेर डॅम- चोपडा मार्गावरील हिसाळे गावापासून अनेर धरणाकडे जाणाºया सर्वात उंच टेकडीवर गोरक्षनाथाचे मंदीर आहे. हे मंदीर नागेश्वर मंदीरापेक्षाही अधिक उंचीवर आहे. या मंदीरवर चढून जाणे अवघड वाटत असले तरी श्रध्देमुळे भाविक या मंदीरापर्यंत सहज पोहचून गोरक्षनाथाचे दर्शन घेतात. तेथून दिसणारे अनेर धरण व पंचक्रोशीतील गावे आणि हिरव्या शालुने पांघरलेल्या सातपुडा रांगांच्या टेकड्या भाविकांचे मन प्रसन्न करतात. थाळनेर- येथील तापी नदीच्या काठावर खोल महादेव मंदीराचा जीर्णोद्वार करण्यात आला असून त्या दिवसापासून या मंदीरातही श्रावण महिन्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.दहिवद- मुंबई आग्रामार्गावरील शिसाकासमोर असलेल्या उंच टेकडीवर महेश्वराच्या मंदीरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.
विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 10:25 PM