आक्सीटोसीन घटकद्रव्य असलेल्या औषधी साठाआढळून आल्याने  तीन मेडिकलचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:31 PM2019-08-04T22:31:24+5:302019-08-04T22:31:44+5:30

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : शहरासह जिल्ह्यातील मेडिकल दुकानांची केली तपासणी

Pharmaceutical reserves containing oxytocin constituents | आक्सीटोसीन घटकद्रव्य असलेल्या औषधी साठाआढळून आल्याने  तीन मेडिकलचे परवाने निलंबित

आक्सीटोसीन घटकद्रव्य असलेल्या औषधी साठाआढळून आल्याने  तीन मेडिकलचे परवाने निलंबित

Next

धुळे : शहरासह जिल्ह्यात आॅक्सीटोसीन घटकद्रव्य असलेल्या मेडिकलची अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे तपासणी करण्यात आली.  तपासणीत खरेदी व विक्रीच्या व्यवहारात तफावत आढळून आलेल्या शहरातील तीन मेडिकल दुकानांचे परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
जिल्हा अन्न व औषध प्रशासनातर्फे आॅक्सीटोसीन या औषधांचा गैरवापर होतो किंवा नाही याची पडताळणी करण्याकरिता एकूण ७६ मेडिकल दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात तीन दुकानात मानवी वापरासाठी असणाºया आॅक्सीटोसीनची खरेदी व विक्रीत तफावत आढळून आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यात एकता मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, धुळे (१५ दिवस निलंबन ), साहील मेडिकल, धुळे (१५ दिवस) आणि रॉयल मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, धुळे (६ दिवस) यांचा समावेश आहे. 
शहरासह जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाद्वारे नियमितपणे औषधी आस्थापनाची तपासणी करण्यात येत आहे. 
या तपासणी दोषी आढळून येणाºया मेडिकल दुकानांवर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याखालील नियम १९४५ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाºया मेडिकल दुकानांवर कारवाई करण्यात येत  आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधन कायद्यान्वये कारवाई
अन्न व औषध प्रशासनातर्फे फेब्रुवारी २०१९ पासून औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्या खालील नियम १९४५ च्या नियमांचे उल्लंघन करणाºया शहरातील सात दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यात मे.महाराष्टÑ मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, साक्री, परवाना रद्द  (सदर दुकान मालकाने याविरोधात स्थगती मिळविली), मे.श्री साईकृषा मेडिकल्स, धुळे (दुकान मालक अपिलात गेले आहे), मे पाटील मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स,नगाव (३१ दिवस निलंबन), मे.धनदाई मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, शिरपूर (९१ दिवस निलंबन), मे  सेवा मेडिकल जैताणे (९१ दिवस निलंबन),  होनेस्ट मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, नवापूर (४५ दिवस निलंबन), मे दत्ताकृपा मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स , म्हसदी ता.साक्री (४५ दिवस निलंबन) यांचा समावेश आहे. सदरची कारवाई व तपासणी मोहीम सुरुच आहे. त्यामुळे दुकानदारांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Pharmaceutical reserves containing oxytocin constituents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे