गुणवंत विद्यार्थ्यांचा बोराडी येथे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:34 PM2019-08-04T22:34:40+5:302019-08-04T22:35:09+5:30
उपक्रम : खूप शिकून मोठे व्हा, दशनाम गोसावी समाजाचा गौरव वाढवा; मान्यवरांचे आवाहन
शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथे दशनाम गोसावी समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सोहळ्यात गौरव करण्यात आला. खूप शिका, मोठे व्हा आणि समाजाचा गौरव वाढवा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना केले.
बोराडी येथील श्रीसतीदेवी मंदिरात दशनाम गोसावी समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे होते. यावेळी नंदुरबार खान्देश दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष साहेबराव गोसावी, उपाध्यक्ष माधवगिर गोसावी, किरण भारती, शरद गोसावी, अमोल भारती, नंदुरबार सेवाभावी संस्थेचे चेअरमन रवींद्र गोसावी, धुळे भटक्या जातीजमाती अध्यक्ष राजू सूर्यवंशी, भटक्या हक्क परिषद नाशिक विभाग दिपक गोसावी, चंद्रसिंग पवार, कर्मवीर रणधीर पतसंस्थेचे चेअरमन शंशाक रंधे, नितीन गोसावी, दिलीप गोसावी, प्रा.व्ही.डी.गोसावी, दिलीप गोसावी, बबन पाटील, जिभाऊ गोसावी, भागवत पवार तसेच बोराडी येथील दशनाम गोसावी समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमोल भारती म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांचा गौरव झाला त्यांना यशस्वी होण्यासाठी अनेक संधी मिळतील, पण त्यावेळी आपण समाजातील लोकांना विसरता कामा नाही. तसेच आई, वडिलांचा सन्मान करा, सध्याचे युग स्पर्धा परीक्षेचा असल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, असेही ते म्हणाले. शरद गोसावी तालुकाध्यक्ष रंधे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवींद्र गोसावी, भिकन गोसावी, खा.द. गोसावी समाजाचे अध्यक्ष वकील गोसावी, भटक्या विमुक्त जाती जाती जमाती समाजाच्या तालुकाध्यक्ष प्रसाद गोसावी यांनी परिश्रम घेतले़ सुत्रसंचालन संदीप चौधरी तर आभार दीपक गोसावी यांनी मानले.