नेर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस तर लोणखेडे गावात गारपीट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:43 PM2021-05-24T20:43:24+5:302021-05-24T20:43:37+5:30
विजेचे खांब वाकले तर तार तुटून पडल्यात. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. ४८ वर्षात एवढ्या मोठ्याप्रमाणावर वादळ आल्याचे बघितले नाही, अशी प्रतिक्रीया लोणखेडेचे सरपंच रवींद्र गिरासे यांनी व्यक्त केली.
धुळे - तालुक्यातील नेर येथे सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर साक्री तालुक्यातील लोणखेडे गावात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. वादळामुळे परिसरातील घरांची पत्रे उडाली तर झाडे उन्मळून पडली.
विजेचे खांब वाकले तर तार तुटून पडल्यात. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. ४८ वर्षात एवढ्या मोठ्याप्रमाणावर वादळ आल्याचे बघितले नाही, अशी प्रतिक्रीया लोणखेडेचे सरपंच रवींद्र गिरासे यांनी व्यक्त केली. या वादळामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.धुळे तालुक्यात नेर येथे पावणे पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे अनेक घरांची पत्रे उडाली तर झाडे उन्मळून पडली. वादळामुळे कांदा पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
लोणखेडेला गारपीट - साक्री तालुक्यातील लोणखेडे येथेही सायंकाळी याचवेळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. याठिकाणीही घरांची पत्रे उडाली तर शेतातील विजेचे खांब वाकले आणि तारा तुटून पडल्याने दोन विजेचे ट्रान्सफार्मर खांबवरुन जमिनीवर पडले. शेतातील भुईमुग शेंगा आणि चाऱ्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.