धुळे शहरात १२५ मोबाइल टॉवर्स असलेल्या कंपन्याकडून दरवर्षी नियमित कर भरणा केला जात नसल्याने त्यांच्याकडे मनपाची तब्बल १ कोटी २९ लाख रूपयांची थकबाकी झाली आहे़ त्यामुळे लवकरच मनपाकडून या कंपन्यांविरूद्ध कारवाई करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.१ कोटी २९ लाखांची थकबाकीशहरात मोबाईल कंपन्या १२५ टॉवर्सद्वारे सेवा पुरवित आहेत़ कंपन्याकडून मालमत्ता धारकाला भाडे नियमित स्वरूपात दिले जाते़ मात्र महापालिका वसुली विभागाला नियमित कराचा भरणा दरवर्षी होत नाही़ २०१६-२०१७ या वर्षात २ कोटी ३ लाख ३१ हजार २४३ थकबाकीपैकी १ कोटी ८ लाख १९ हजार ८८१ रूपयांची वसुली झाली होती़ त्यात सर्वाधिक थकबाकी एकाच मोबाईल कंपनीकडे आहे़ तर यंदाच्या आर्थिक वर्षात १ कोटी ७७ लाख ४३ हजार १७२ रूपयांची थकबाकी या कंपन्याकडे थकली आहे़४८ लाखांची वसुली.मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे चालु आर्थिक वर्षात ८० लाख ३१ हजार ८१० रुपये बाकी आहे़ तर ९७ लाख ११ हजार ३६२ रुपये मागील थकबाकी अशी दोन्ही मिळून १ कोटी ७७ लाख ४३ हजार १७२ रुपये महापालिका कर विभागाचे घेणे आहे़ दरम्यान त्यापैकी ४८ लाख ८८२ रुपयांची वसुली झाली आहे़ मात्र कंपन्यांकडून वसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतेही कारवाईची भुमिका घेतली नसल्याने वसुलीला प्रतिसाद मिळालेला नाही़ त्यासाठी मनपाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे़अशा आहेत कंपन्या..मनपा हद्दीतील विविध कंपन्यांचे टॉवर्स बसविण्यात आलेले आहे़ त्यात रेकॉर्डवर एटीसी कंपनीचे २७ तर असेंड कंपनीचे २१, जिओ कंपनी २०, जीटी एसचे १२, भारत संचार निगम लिमिटेडचे १०, रिलायन्स ९, आयडिया ७, टॉवर व्हीजन ६ टॉवर्स अशा संख्येने नोंद महापालिका कर विभागात करण्यात आलेली आहे़आॅनलाईन कराचा भरणाथकबाकीदार मालमत्ता धारकांना करात सवलत मिळावी, महापालिका कर विभागात मोठ्या प्रमाणात करदात्याचा गर्दी होत आहे़ एकीकडे नागरिकांचा कर भरण्यासाठी प्रतिसाद मिळत असतांना दुसरीकडे मात्र थकबाकीदार मोबाईल टॉवर कंपन्यांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे़ मार्चंनंतर थकबाकीदार मालमत्ताधारक व कंपन्यावर कारवाईची दंडात्मक भुमिका महापालिका प्रशासनाकडून घेतली जाणार आहे़ तत्पुर्वी मोबाईल टॉवर कंपन्यांकडून थकीत कराचा भरणा आॅनलाईन पध्दतीने केला जात आहे़ मार्चनंतर थकबाकी मालमत्ता धारक व टॉवर कंपन्यावर प्रशासन वसुलीसाठी निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली़कर विभागाचे दुर्लक्षटॉवर्स कंपन्याकडे कोटयावधीची थकबाकी आहे़ मात्र प्रशासनाकडून कंपन्याविरुद्ध कारवाई केलेली नसल्याने कंपन्यानी कर भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे़ तत्कालिन आयु्क्त संगिता धायगुडे यांच्या कार्यकाळात थकबाकीदार टॉवर सिल केले होते़ त्यांनतर मात्र प्रशासनाकडून कारवाईची झालेली दिसुन येत नाही़
मोबाईल टॉवर कंपन्या कारवाईच्या रेंजमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:23 PM