आरटीई प्रवेशासाठी धुळे जिल्ह्यात २१२३ आॅनलाइन अर्ज प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 11:22 AM2019-03-22T11:22:48+5:302019-03-22T11:24:12+5:30

गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी शाळा व जागा वाढल्या

Receipt of 2123 online applications in Dhule district for RTE admission | आरटीई प्रवेशासाठी धुळे जिल्ह्यात २१२३ आॅनलाइन अर्ज प्राप्त

आरटीई प्रवेशासाठी धुळे जिल्ह्यात २१२३ आॅनलाइन अर्ज प्राप्त

Next
ठळक मुद्दे५ मार्चपासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू१ हजार २३७ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशगेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी जागा व शाळा वाढल्या

आॅनलाइन लोकमत
धुळे : शिक्षण हक्क कायदा अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झालेली आहे. ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन आहे. जिल्ह्यातील ९७ इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये १ हजार २३७ विद्यार्थ्यांना आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी १९ मार्च अखेरपर्यंत २ हजार १२३ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून देण्यात आलेली आहे.
शिक्षण हक्क कायदा अंतर्गत १४ वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण देण्याचा कायदा आहे. या अंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचीत घटकांत मोडणाऱ्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एकूण प्रवेशाच्या २५ टक्के राखीव जागा या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून भरण्यात येतात.
जिल्ह्यात २०१३-१४ पासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इयत्ता पहिलीकरीता आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया ५ मार्च पासून सुरू झालेली आहे. आॅनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ मार्च आहे. आॅनलाइन अर्जात विचारलेली माहिती आणि त्यासोबत पुरावे म्हणून नोंदवलेली यादीतील आवश्यक कागदपत्रे प्रवेश घेतांना सोबत बाळगायची आहेत.
आरटीई प्रवेश अंतर्गत यावर्षी चार शाळांची नव्याने भर पडलेली असून ५६ जागा वाढल्या आहेत. २०१८-१९ या वर्षासाठी ९३ शाळांमध्ये १ हजार १८१ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ३ हजार ५७ आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. पाच फेऱ्यांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया झाली. त्यात १ हजार २६९ बालकांची लॉटरी लागली होती. त्यातून ९५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २२२ विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतला नाही.
तर २०१९-२० या वर्षासाठी जिल्ह्यात ९७ शाळांमध्ये १ हजार २३७ जागा आहेत. यासाठी १९ मार्च अखेरपर्यंत २ हजार १२३ आॅनलाइन अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.




 

Web Title: Receipt of 2123 online applications in Dhule district for RTE admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.