हस्ती स्कूलमध्ये शालेयस्तर विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 10:55 PM2019-12-15T22:55:13+5:302019-12-15T22:55:54+5:30

दोंडाईचा : बालवैज्ञानिकांनी सादर केली ३०० उपकरणे, मान्यवरांच्याहस्ते गौरव

School-level science demonstration at Hastie School | हस्ती स्कूलमध्ये शालेयस्तर विज्ञान प्रदर्शन

Dhule

Next

दोंडाईचा : येथील हस्ती पब्लिक स्कूलमध्ये ‘विज्ञान गणित ज्ञानयात्रा’ या संकल्पनेवर आधारीत १७वे शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले.
प्रदर्शनात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बालवैज्ञानिकांनी एकूण ३०० उपकरणे सादर केली होती. प्रदर्शनातंर्गत विज्ञान प्रश्नमंजुषा, रांगोळी, क्ले मॅप, रोबो रेस, कथाकथन आदी कार्यकम घेण्यात आले.
गटनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विजेते पुढीलप्रमाणे- पहिली ते दुसरीच्या अ गटात- हस्ती स्कूलच्या संस्कृती देवरे हिने सिम्पल मशिन आॅफ अँडिशन उपकरण सादर करुन प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय-हर्षदा सुर्यवंशी- बेनिफिट्स आॅफ ट्री, तृतीय- आर्या सोनार- मॅथेमँटिक्स इन एव्हरी डे, तर प्रियांशी जाधव हिने मेडिकल प्लांट्स फॉर हेल्थ उपकरण सादर करुन उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले.
हस्ती गुरूकुल मराठी माध्यमच्या प्रथमेश गिरासे याने विंड मिल आॅन सोलर सिस्टम उपकरण सादर करुन प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय-जय पाटील- वॉटर फिल्टर, तर वरूण पाटील याने इलेक्ट्रीक मँग्नेटिक फिल्ड सादर करुन तृतीय क्रमांक मिळविला.
हस्ती वर्ल्ड स्कूलच्या मोक्षदा पाटील हिने इंटरनल बॉडी पार्टस सादर करुन प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय-गर्वी अग्रवाल व प्रथम रूपचंदाणी- आॅरगॅनिक फार्मिंग, तृतीय- आर्यन जैन- कंट्रोल एअर पोल्युशन, हेमंत नागरे, उत्तेजनार्थ -अनिल धनगर व प्रफुल दुग्गड- मॅथेमँटिक इन एव्हरी डे लाईफ.
इयत्ता तिसरी ते पाचवीच्या ब गटात- यज्ञेश परमार व सर्वेश पाटील यांनी इलेक्ट्रीक कार सादर करुन प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय-कुणाल जाधव- ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, तृतीय-देवश्री भावसार- लँड पोल्युशन, उत्तेजनार्थ -देवांश पवार व निनाद भामरे- क्लि क्लिंलीनेस अँड हेल्थ;
हस्ती स्कूल- प्रथम-हितांशु परदेशी, शौर्या पाटील व मनन पाटील- होम मेड प्रोजेक्टर, द्वितीय-अलिमा पिंजारी- एन्व्हायरमेंट इश्यु, तृतीय- दुर्गेश पावरा व गणेश पावरा- डेसिमल कन्व्हर्जन, उत्तेजनार्थ -रोशनी पावरा- प्लेह व्हँल्यु.
सहावी ते नववीच्या क गटात- प्रथम- दिव्या लखोटिया व वैष्णवी खलाणे- मँथेमँटिकल मोडेल मँजिक, द्वितीय- उदयराज बागल, दर्शन ठाकुर व गौरव बोरसे- मॉडर्न टेक्नॉलॉजी इन अ‍ॅग्रीकल्चर, तृतीय-समृद्धी सांगळे- टर्निंग प्लास्टिक इन टू फ्युल. तर प्रदीप पावरा व हर्षल सुर्यवंशी- वर्किंग मॉडेल फॉर ट्रँगल अँड करस्पाँडिंग अँगल सादर करुन उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले.
अन्य स्पर्धेतील विजेते- विज्ञान प्रश्नमंजुषा- ताहा बोहरी, धिरज गुजराथी, रोबो रेस- सचिन पावरा व हर्षल सुर्यवंशी, अब्बास दाउदी, राजन पाटील, तर क्ले मॅपिंग स्पर्धेत- शैलेष पावरा व निखील पावरा यांनी यश मिळविले. कथाकथन स्पर्धेत- ऋषिकेश पवार, शौर्य पाटील, केशवी बागल, दिव्या लखोटिया, सुर्यभान गिरासे यांनी यश मिळविले. रांगोळी स्पर्धेत- मानसी बोरसे व साक्षी बेहरे, प्राची शिनकर व नंदिनी मिहानी, भूमिका निगम यांनी यश मिळविले.
सर्व यशस्वी बाल वैज्ञानिकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

Web Title: School-level science demonstration at Hastie School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे