धुळे :राज्य परिवहन महामंडळात दाखल झालेली शिवशाही बससेवा अनेक मार्गावर सुरु आहे़ यात धुळे ते जळगाव मार्गावर विनावाहक सेवा सुरु होऊन बंद झाली होती़ यानंतर आता नव्याने जळगाव - धुळे मार्गावर शिवशाही बससेवा सुरु करण्यात येणार आहे़ यात आता वाहक राहणार असून काही महत्वाच्या गावांचे थांबे देखील देण्यात येणार आहे़ राज्य परिवहन महामंडळातर्फे आरामदायी बससेवा शिवशाही नावाने दाखल करण्यात आली आहे़ या बहुचर्चित शिवशाही बस आरामदायी बैठक व्यवस्था, पूश बॅक, एसीसह सीसीटीव्ही कॅमेरे, एअर सस्पेन्शन शॉकअप असून बसची आसन क्षमता ४३ इतकी आहे़ या सुविधांमुळे प्रवाश्यांचा लांब पल्याचा प्रवास आरामदायी होतो़ ही शिवशाही बससेवा जळगाव - पुणे मार्गावर सुरु आहे़ शिवशाहीमधून आरामदायी प्रवास करण्यासाठी अन्य बसच्या तुलनेत प्रवाश्यांना लवकर पोहचविता यावे, याकरीता विनावाहक सेवा सुरु करण्यात आली होती़१ आॅक्टोबरपासून अंमलधुळ्याहून जळगाव जाण्यासाठी अगदी तास-दीड तासाने बस धावत आहेत़ यात आता शिवशाही बसची सेवा जोडण्यात येत आहे़ म्हणजे शिवशाही बसमधून आरामदायी प्रवासाची सेवा येत्या १ आॅक्टोबरपासून जळगाव विभागाकडून सुरु करण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक यांनी सांगितले़ यामध्ये दिवसभरातून जळगावहून तीन आणि धुळे विभागाकडून तीन शिवशाही बस सोडण्यात येणार आहेत़ सामान्य प्रवाशांना फायदासर्वसामान्य नागरिक इच्छा असून देखील या बसमधून प्रवास करु शकत नव्हते़ या बसला कुठेही थांबा नसल्याने पारोळा आणि एरंडोल पर्यंतच्या नागरीकांना साध्या बसमधून प्रवास करावा लागत होता़ आता जळगाव ते धुळे आणि धुळे ते जळगाव या मार्गावरील पारोळा आणि एरंडोल या ठिकाणी ही बस थांबणार आहे़ परिणामी या थांब्यावरील प्रवाश्यांची सोय होणार आहे़ अधिकचे असणार भाडेशिवशाही बसमधून प्रवास करणाºया नागरीकांना साध्या बसपेक्षा अधिकचे भाडे मोजावे लागणार आहे़ त्यामुळे सुध्दा काही प्रवाश्यांची नाराजी असणे स्वाभाविक आहे़ साध्या बसप्रमाणे या बसमधून प्रवास करणाºया प्रवाश्यांकडून भाडे आकारणी केल्यास अधिक सुलभ होऊ शकेल असे प्रवाश्यांना वाटते़ प्रवाशांअभावी खोळंबागेल्या काही दिवसांपासून जळगाव ते धुळे या मार्गावर शिवशाही बससेवा सुरु होती़ पण, नियमित भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी होत असल्यामुळे प्रवाशांंकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता़ परिणामी या मार्गावरील सेवा काही काळासाठी ठप्प होती़ आता दोन थांबे दिल्यामुळे ही बससेवा पूर्ववत सुरु करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे़ दोन थांबे अन् वाहक सुध्दाजळगाव ते धुळे मार्गावर यापुर्वी सुरु केलेली बससेवा ही विनावाहक होती़ यामुळे ही बस जळगावहून सुटल्यास न थांबता थेट धुळे येत होती़ परिणामी यात जळगावहुन जितके प्रवासी बसलेले असतील तेवढेच प्रवासी घेऊन बस धुळे धावत होती़ या सेवेला मिळणाºया अल्प प्रतिसादामुळे शिवशाहीची विनावाहक सेवा बंद करावी लागली होती़ यात पुन्हा सेवा सुरु केली जात असून यामध्ये वाहक असणार आहे़ यासोबतच एरंडोल आणि पारोळा हे दोन थांबे देण्यात आले असून येथून प्रवासी घेऊन जाईल़ यामुळे आता या सेवेला किती प्रतिसाद मिळतो, हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे़
आजपासून सुरु होणार शिवशाही बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:23 PM