लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणुकीत भाजपाचे ६५ उमेदवार दिले आहेत, मात्र त्यातील ५७ उमेवार आघाडी सरकारमधील आहे़ या सरकारला दुसºयांच्या मुलाच्या मुलाचे नामकरण करून आपले नाव देण्याची सवल आहे़ म्हणुन त्यांना दुसरे उमेदवार मिळाले नाही़ पक्षाने ज्यांना पदे देऊन मोठी केलीत त्यांना त्यांनीच पक्षाची गद्दारी केली़ पक्षांशी गद्दारी करणाºयांना धुळेकरांनी निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे विरोधी पक्ष नेते धनजय मुंडे यांनी केले़मील परिसर येथे सभा घेण्यात आली़ यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदिप बेडसे, प्रभाग १५, १७ मधील उमेदवार तूुषार पाटील, गिता नवले, नंदलाल अजळकर, रावण नवले, यमुनाबाई जाधव, मथुराबाई इखे अशोक पाटोळे, कैलास चौधरी, भगवान वाघ, राजु एलमामे, हरिभाऊ अजळकर आदी उपस्थित होते़ देशात आघाडी सरकारची सत्ता असतांना पेटॉल ५० रूपये तर गॅस सिलिडंर पवणे चारशे रूपये होते़ मात्र भाजप महागाईच्या मुद्यावर राजकारण केले आणि अच्छे दिनाचे स्वप्न दाखवुन केद्रात आणि राज्यात सत्ता मिळविली़ मोदी म्हणतात परदेशातुन जाणार काळापैसा आणुन १२५ कोटी जनतेच्या खात्यावर १५ लाख रूपये खात्यावर जमा करण्याची घोषणा केली होती़ मात्र एकाही व्यक्तीच्या खात्यावर एक रूपया देखील टाकला नाही़ भाजप सरकार एकीकडे पारदर्शक कारभार नारा लावले, मात्र विद्यमान भाजपाच्या आमदारांचा भष्ट्राचार उघडकीस असतांना देखील हे आमदारांचा भष्ट्राचाराला पाठीशी घालत आहे़ भाजपाच्या आमदारांचा भष्ट्रचारापैसा निवडणुकीत मंत्री महाजन धुळ्यात आणुन सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहे़ धुळ्यात प्रवेश करतांना अनेक पक्षांचे डिजीटल बॅनर लावलेले पाहीले, मात्र भाजपाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोपेक्षा जळगावचे प्रभारी मंत्री गिरीष महाजन यांच्या मोठा फोटो होता़ मोदी, फडणवीसपेक्षा महाजनअधिक श्रेष्ठ आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी पक्षाचे विरोधी पक्षनेते धंनजय मुढे यांनी केला़ यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले़
पक्षाची बेईमानी करणा-यांना धुळेकरांनो धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:16 PM