मनपा इमारतीचेच फायर आॅडीट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 11:06 PM2019-12-05T23:06:43+5:302019-12-05T23:07:21+5:30
धक्कादायक : अग्निशमन विभाग प्रमुखांची माहिती, सक्षम यंत्रणेचाही अभाव
धुळे : शहरातील खासगी इमारतींसह चित्रपट गृह, रुग्णांलयाच्या इमारती पाठापोठ महापालिकेच्या नूतन इमारतीचे देखील फायर आॅडीट झाले नसल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेअंती समोर आली़ सदस्य नागसेन बोरसे यांनी अग्निशमन विभागाच्या वाहनांचा विषय छेडला असता संबंधित अधिकाºयांकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला़ तातडीने ही बाब मार्गी लावण्याचे आदेश पारीत झाले़
येथील महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक सभापती युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ विमलबाई पाटील, सुनील सोनार, नागसेन बोरसे, रावसाहेब पाटील, लक्ष्मी बागुल, सुरेखा उगले, सुरेखा देवरे, कशीश उदासी, संजय भील, शेख शाहजहान बी़ बिस्मील्ला, सुभाष जगताप, सईदा अन्सारी, अमीन पटेल या सदस्यांसह उपायुक्त गणेश गिरी, प्रभारी नगरसचिव नारायण सोनार तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते़
अग्निशमन विभाग लक्ष्य
नागसेन बोरसे यांनी अग्निशमन विभागाची माहिती जाणून घेत असताना दाट लोकवस्तीच्या भागात काही दुर्घटना घडल्यास अग्निशमन बंब आपल्याकडे आहे का, फायर आॅडीट झाले आहे का, जीवित व वित्तहानी झाली तर याला जबाबदार कोण, अशा प्रश्नांचा बडीमार केल्याने विभागप्रमुख तुषार ढाके निरुत्तर झाले़ दाट लोकवस्तीत जावून दुर्घटना रोखण्यासाठी आपल्याकडे वाहन नसल्याचे त्यांनी सांगितले़ तातडीने याकडे लक्ष देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या़
भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे़ रात्री १० नंतर भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे़ चावण्याच्या घटनात वाढ होत असल्याने किमान दोन हजार रुपये इतका खर्च येतो़ गरीबांनी ऐवढे पैसे आणायचे कुठून? महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने यावर उपाययोजना करावी आणि भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अमीन पटेल यांनी लावून धरली़ अन्यथा, महापालिकेत कुत्रे सोडण्यात येतील अशा इशाराही त्यांनी दिला़
डंपींग ग्राऊंडवरही काथ्याकुट
शहरातील वरखेडी रोडवरील डंपींग ग्राऊंडमुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी वाढल्या आहेत़ नियोजन नसल्याने कचरा रस्त्यावर येतो़ अपघातासह आरोग्याचा प्रश्न असल्याने यावर काथ्याकुट झाला़
काही वेळातच अजेंड्यावरील विषय मंजूर
४स्थायी समितीच्या बैठकीत ९ विषय चर्चा आणि मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते़ जेवढा वेळ विषय वाचण्यासाठी लागला तेवढ्याच वेळात या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली़ त्यात १३ लाख ३७ हजार ५५४ रुपयांची कामे होती़ विरोधी गटाकडून याला विरोध दर्शविण्यात आला असलातरी सत्ताधाºयांकडून त्याला चर्चेविना मंजुरी मिळाली़