तºहाडी/मोहाडी प्र.डांगरी : परिसरातील शेत शिवारात लष्करी अळीने मका पिकावर हल्ला चढविल्याने हातातोंडाशी आलेली पिके जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.तºहाडी परिसरशिरपूर तालुक्यातील तºहाडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी केली आहे. शेकडो एकरवरील मका पिकावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने हाता तोंडाशी आलेले पिक वाया जाण्याच्या भितीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.ऐन दुष्काळी परिस्थितीत मका पिकापासून जनावरांना चारा उपलब्ध होईल. या भरवशावर शेतकºयांनी पेरा केला होता. परंतू मका पिकावर मोठ्या प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव झाल्याने तो चारा जनावरांना घातल्यास जनावरे दगावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही दिवसापुर्वी मक्याच्या एका रोपट्यात तीन ते चार अळ्या आतील भागात दिसून येत होत्या. मात्र, आता त्याच अळ्या मक्याच्या कणसात शिरल्याने मका पिक पूर्णपणे उध्वस्त झाले असून शेतकºयांना मक्याचा हुरडा खाण्याचीही भिती वाटु लागली आहे. कृषी विभागाने शेतकºयांना फवारणी करण्याचे आवाहन केले होते. परंतू त्या फवारणीने काहीच परिणाम झाला नसल्याने कृषी विभागही मार्गदर्शन करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. पिकावर चार फवारणी करूनही मका पिक हातातून गेले असून महागडया औषधांचाही काहीच परिणाम दिसून आला नसल्याने शेतकरी मोठया संकटात सापडले आहेत.मका पिकापासून उत्पादन तर मिळणार नाहीच, परंतू चाराही मिळणार नसल्याने शेतकरी हताश झाले आहे. पाच-सहा वर्षांपासून दुष्काळात होरपळलेला शेतकरी यंदा मोठया पावसाच्या प्रतीक्षेत होता. सततच्या रिमझिम पावसाने पिकेही चांगली आली होती. परंतू मका पिकावर लष्करी अळीने आक्रमण करुन पिक हिरावून घेतले आहे.मका पिकावर शेतकºयांनी हजारो रुपये खर्च केले. मात्र, लष्करी अळीच्या आक्रमणामुळे झालेला खर्चही निघाणार नाही. त्यामुळे शासनाने पिकाचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.मोहाडी प्र.डांगरी परिसरधुळे तालुक्यातील मोहाडी प्र.डांगरीसह परिसरातील सातरने, विश्वनाथ, सुकवड, हेंकलवाडी, तामसवाडी, शिरढाने, जापी आदी शिवारात मका पिकावर लष्करी अळीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.मोहाडी परिसरात मका पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कारण विनाखर्चीक हे पीक असल्यामुळे यावर्षीही मोठया प्रमाणात मक्याचा पेरा झालेला आहे. परंतू पिकाच्या प्राथमिक अवस्थेत पोग्यावरच अळीचे आक्रमण झाल्यामुळे महागडे कीटकनाशक फवारणी करूनही अळी आटोक्यात आली नव्हती. आता तर पीक मोठे झाले असून चार ते पाच फवारण्या करूनही अळी आटोक्यात न येता कणसात शिरली आहे. त्यामुळे उत्पन्नात जास्त घट येण्याची शक्यता शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत.अळीचा प्रादुर्भाव जास्त झालेल्या क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून कृषी विभागाने त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मध्यंतरी कृषी पर्यवेक्षक पी.जे. पाटील यांनी भेट देऊन शेतकºयांना अळीला अटकाव करण्यासाठी फवारणीबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते. दरम्यान, अळीचा प्रादुर्भाव असाच राहिला तर शेतकरी मका पिकाकडे पाठ फिरवतील व त्यामुळे भविष्यात चारा टंचाईचा सामना करावा लागेल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 10:38 PM