लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील घेगाव येथील राजू सुरसिंग पवार (४०) याला लळींग टोलनाक्याजवळील एका हॉटेलसमोर मंगळवारी रात्री ११ वाजता पकडण्यात आले़ त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यात ३ पिस्तूल, ६ जिवंत काडतूस असा एकूण ९० हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला़ संशियत राजूला पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी बुधवारी पहाटे मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात घातक शस्त्र शोध मोहीम सुरू आहे़ या मोहीमेंतर्गत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळींग टोलनाक्याच्या पुढे एका हॉटेलजवळ एक व्यक्ती बंदूक विक्रीसाठी आला असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळाली़ माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, मोहाडी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलीस कर्मचारी मोहम्मद मोबीन, रफीक पठाण, राहूल सानप, कबीर शेख, आरीफ पठाण, बिपीन पाटील, प्रभाकर ब्राह्मणे, राजेंद्र मराठे, जितेंद्र वाघ या पथकाने लळींग टोलनाका परिसरातील हॉटेलजवळ सापळा लावला़ मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास एक व्यक्ती हातात काळ्या रंगाची बॅग घेवून रस्ता ओलांडत असताना पथकाला दिसला़ त्या व्यक्तीला पकडण्यात आले़ त्याची विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाली़ त्याची अधिक चौकशी केली असता त्याने राजू सुरसिंग पवार (४०, रा़ घेगाव, ता़ सेंधवा जि़ बडवानी, मध्यप्रदेश) असे सांगितले़ त्याची अंगझडती आणि बॅगची तपासणी केली असता बॅगेत तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतूस आढळल्याने ती जप्त करण्यात आली़ राजू पवार याला अटक करण्यात आली असून बुधवारी पहाटे त्याच्याविरोधात मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला़
सेंधव्याच्या आरोपीकडून जिवंत काडतूसासह तीन पिस्तुल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:26 PM
धुळे पोलिसांची कारवाई : मोहाडीसह विशेष पथकाची कामगिरी
ठळक मुद्दे६ जिवंत काडतूसासह तीन पिस्तुल जप्तसेंधव्याच्या आरोपीला धुळ्यात पकडलेधुळे पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी