अयोध्देतील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी खासदार डॉ़ सुभाष भामरेंकडून अडीच लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 10:41 PM2021-01-24T22:41:37+5:302021-01-24T22:41:48+5:30
प्रत्येकाने या पवित्र कार्यात आपले योगदान द्यावे - आवाहन
धुळे - संपुर्ण देशाच्या अस्मीतेचे आणि श्रध्देचे प्रतिक असलेल्या भगवान श्रीराम यांचे भव्य मंदिर राम जन्मभुमि अयोध्या येथे उभारले जाणार आहे. मंदिर निर्माण राष्ट्र निर्माणाच्या या पवित्र कार्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्या वतीने २ लाख ५१ हजाराचा निधी धनादेशाव्दारे दिला आहे.
छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या भुमिपुजन सोहळ्यावेळी राम मंदिर निर्माणासाठी वैयक्तिक स्वरुपात योगदान देत अडीच लाख रुपये देण्याची घोषणा खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी नुकतीच केली होती. त्यानुसार श्रीराम मंदिर नवनिर्माण निधी समर्पण समितीच्या पदाधिकाऱ्यांना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्या निवासस्थानी अडीच लाखाचा धनादेश सुपुर्द केला आहे.
धनादेश स्विकारण्यासाठी निधी समर्पण संकलन समितीचे पदाधिकारी तथा राष्ट्रीय स्वंय सेवक संघाचे देवगिरी प्रांत प्रमुख परागजी, शरदजी, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंदक्रांत सोनार, उद्योजक जितेंद्र चवटीया, योगिराज मराठे, प्रशांत मोराणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभु श्रीराम यांचे भव्य मंदिर उभे होणार असून प्रत्येक भारतीयाचे हे स्वप्न पुर्ण होणार असल्याने प्रत्येकाने या पवित्र कार्यात आपले योगदान द्यावे. असे आवाहन सुध्दा यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी केले.