अतुल जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कस्काऊट-गाईड ही एक जागतिक शैक्षणिक चळवळ आहे. मुला-मुलींमधील उपजत कला, कौशल्य गुणांची जोपासना करून त्यांना छंदाकडून चारितार्थकडे नेता यावे यासाठी स्काऊट-गाईड अभ्यासक्रमाची योजना आहे. आता विद्यापीठस्तरावर महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी रोव्हर- रेंजर उपक्रम सुरू करावा यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती धुळे जिल्हा स्काऊट आयुक्त प्रा. विलास चव्हाण यांनी दिली. त्यांच्याशी ‘लोकमत’चा झालेला संवाद असा-प्रश्न : स्काऊट-गाईडची संकल्पना काय आहे?प्रा.चव्हाण : स्काऊट-गाईडमध्ये बनी, कब, स्काऊट-गाईड, रोव्हर-रेंजर हे चार भाग आहेत. ३ ते २५ वयोगटातील मुला-मुलींसाठी खेळ, गोष्टी शैक्षणिक कार्यक्रम विविध उपक्रम, राष्टÑीय मेळावे, असे चार भिंतीबाहेरचे खरे आनंददायी शिक्षण देणारी तसेच संस्कारक्षम वयात राष्टÑीय एकात्मता जोपासणारी ही चळवळ आहे.प्रश्न : जिल्हयात किती युनिट कार्यरत आहेत.प्रा. चव्हाण : जिल्हयात स्काऊट-गाईडची सभासद संख्या ५२ हजार ७५७ एवढी आहे. तर स्काऊटचे १ हजार २४ व गाईडचे ६०८ युनिट कार्यरत आहेत. याशिवाय कबचे ७९, बुलबुलचे ७८ युनिट कार्यरत आहेत.प्रश्न : आगामी योजना काय आहेप्रा.चव्हाण : १२वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी रोव्हर-रेंजर उपक्रम आहे. मुबंई-नाशिक या ठिकाणीच हा उपक्रम सुरू आहे. हा उपक्रम सुरू करावा असे शासनाचे २०१७पासूनचे आदेश आहे. विद्यापीठस्तरावर रोव्हर-रेंजर उपक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.प्रश्न : एनसीसी, एनएसएसप्रमाणेच स्काऊटकडे ओढा आहे का?प्रा.चव्हाण : विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच वर्दीचे विशेष आकर्षण असते. त्यामुळे एनसीसी, एनएसएसप्रमाणे स्काऊटकडेही विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यांनाही राज्यस्तरावरील परेडमध्ये सहभागी होता येते.सर्वोच्च पुरस्कार४स्काऊटमधील एलिफंट हा सर्वोच्च राष्टÑपती पुरस्कार आहे. धुळ्यातील शांताराम शेंडे व भा.ई.नगराळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.४धुळ्याने भारताला दोन स्काऊट आयुक्त दिले आहेत. यात एक व्यंकटराव रणधीर व भा.ई.नगराळे यांचा समावेश आहे.स्काऊट-गाईड ही जागतिक शैक्षणिक चळवळ आहे. यात विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी झाले पाहिजे . - प्रा.विलास चव्हाण
विद्यापीठस्तरावर रोव्हर-रेंजर उपक्रम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:46 PM