म्हसदी आरोग्य केंद्रावर १५ दिवसांपासून लस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:39 AM2021-05-25T04:39:50+5:302021-05-25T04:39:50+5:30
म म्हसदी:-येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल १५ दिवसांपासून कोविडच्या लसीकरणाला ब्रेक लागल्यामुळे आरोग्य केंद्रात शुकशुकाट जाणवत आहे. येथील आरोग्य ...
म
म्हसदी:-येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल १५ दिवसांपासून कोविडच्या लसीकरणाला ब्रेक लागल्यामुळे आरोग्य केंद्रात शुकशुकाट जाणवत आहे.
येथील आरोग्य केंद्राला १६ गावे जोडलेली आहेत. या गावांमधून नागरिक या केंद्रात लसीकरणासाठी येतात. मात्र लसच उपलब्ध नसल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून येथे लसीकरण बंदचा फलक लावलेला आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातून येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना फलक पाहून माघारी फिरावे लागत आहे. आधीच येण्या-जाण्यासाठी वाहने नाहीत. मोबाइलला रेंज नाही. अशा स्थितीत येथे येऊन ज्येष्ठ नागरिक माघारी जात आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र लस नसल्यामुळे आरोग्य केंद्राच्या लसीकरण आवारात गेल्या पंधरा दिवसांपासून शुकशुकाट दिसून येत आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांची विचारणा केली असता लस मिळताच येथे लसीकरण सुरू होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने येथे पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य यादवराव देवरे, एन.टी. बोरसे, अशोक बाविस्कर आदींनी केली आहे.