लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीसाठी मतदारांना मतदार चिठ्ठयांच्या वितरणाचे काम २८ नोव्हेंबरपासून हाती घेण्यात आले होते़ त्यानुसार आतापर्यंत २ लाख १९ हजार ५३१ मतदारांना चिठ्ठयांचे वितरण झाल्याची माहिती मनपाचे उपायुक्त शांताराम गोसावी यांनी दिली़राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे़ मनपा निवडणूकीत ३ लाख २९ हजार ५६९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ त्यापैकी ६४ टक्के मतदारांना चिठ्ठयांचे वितरण झाले असून शनिवारी देखील उर्वरीत मतदारांना चिठ्ठया वितरीत केल्या जातील़ मनपा प्रशासनाकडून मतदान जागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांना मतदार याद्यांमध्ये नाव न सापडण्याची अडचण निर्माण होते. यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण होत असते. ही स्थिती निर्माण होऊ नये म्हणून यासाठी निवडणूक आयोगाकडूनच मतदारांना चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे. ज्या मतदारांना चिठ्ठया मिळणार नाही, त्यांनी व्होटर सर्च अॅपवर आपले नाव शोधून मतदान केंद्राची माहिती घ्यावी, किंवा आपल्या भागातील मनपा लिपीकाकडून चिठ्ठया प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन उपायुक्त शांताराम गोसावी यांनी केले आहे़ चिठ्ठया वितरणासाठी सुमारे ३२५ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती़ सायंकाळी सादर करावा लागतो अहवाल सकाळपासून बीएलओ, मनपा कर्मचारी व आशा वर्कर यांच्या माध्यमातून मतदार चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे. प्रत्येक बीएलओंना स्वतंत्र प्रभाग व काही भाग विभागून देण्यात आले आहेत. सायंकाळी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप झाल्यानंतर प्रत्येकाला दिवसभराचा संपूर्ण अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करावा लागत आहे. ज्या मतदारांचे पत्ते सापडले नाहीत, अशा मतदारांच्या चिठ्ठ्या निवडणूक विभागात जमा केल्या जात आहेत. तसेच मतदार चिठ्ठ्या वाटप करताना संबंधित मतदाराचा मोबाइल क्रमांक व सहीदेखील घेतली जात आहे. त्यानंतर सायंकाळी मनपा प्रशासनाकडून या मतदारांना मोबाइलद्वारे संपर्क करून त्यांना मतदार चिठ्ठ्या भेटल्या की नाही. याचीदेखील खातरजमा करून घेण्यात येत आहे.एका दिवसात करावे लागेल १ लाख १० हजार चिठ्ठयांचे वितरण़़मतदानाला आता केवळ आजचा दिवस शिल्लक असून उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे़ दरम्यान, मनपाने मतदार चिठ्ठया वाटपासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांची ४ तारखेला बैठक घेतली होती़ त्यात ७ डिसेंबरपर्यंत सर्व चिठ्ठयांचे वितरण न झाल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला होता़ मात्र ही मुदत संपुष्टात येऊनही अजून सुमारे १ लाख १० हजार मतदारांना चिठ्ठया वितरीत झाल्या नसून उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे़ मतदान केंद्रावरदेखील मनपाकडून मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था केली जाऊ शकते़
दोन लाख मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:18 PM