ओला दुष्काळ जाहीर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 09:14 PM2020-09-24T21:14:52+5:302020-09-24T21:15:34+5:30
धुळे : जि.प.सदस्य राम भदाणे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :तालुक्यासह जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जि.प. सदस्य राम भदाणे यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कापूस, बाजरी, ज्वारी व इतर पिके काढणीला आली असतांनाच वादळी व मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आलेली आहे.जास्तीच्या पावसामुळे उडीद, मूग शेतकºयाच्या हातून आधीच गेले आहेत. आता राहिलेले पिकांचे देखील नुकसान झालेले आहे. कापूस ओला असून, खराब झाल्यामुळे व्यापारी कापसाला भाव देत नाही. इतर पिकांचीही हीच स्थिती आहे.
धुळे तालुक्यात सततचा दुष्काळ असून, मागीलवर्षीदेखील अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच कोरोना महामारीमुळे रब्बी पिकांनाही बाजारपेठ मिळालेली नाही. तेव्हाही शेतकºयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकºयांना जगाव की मराव असा प्रश्न निर्माण झालेला आहे.शेतकºयांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच शासनाने शेतकºयांना दिलासा द्यावा यासाठी शेतकºयांना नुकसान भरपाई देवून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकºयांना मदत मिळाली नाही तर शेतकºयांच्या मदतीसाठी सरकार विरोधात संघर्ष उभा करू असा इशाराही निवेदनाद्वारे राम भदाणे यांनी दिला आहे.