धुळयातील पांझरा नदीकाठच्या रस्त्यांप्रकरणी हरीत लवादमध्ये १४ मार्चला कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 04:25 PM2018-03-01T16:25:53+5:302018-03-01T16:25:53+5:30

नगरसेवक नरेंद्र परदेशी यांची याचिका, प्रशासकीय यंत्रणांना नोटीस

Work on 14th March of the Harish Arbitration on the roads of Dhanya Panjhra river | धुळयातील पांझरा नदीकाठच्या रस्त्यांप्रकरणी हरीत लवादमध्ये १४ मार्चला कामकाज

धुळयातील पांझरा नदीकाठच्या रस्त्यांप्रकरणी हरीत लवादमध्ये १४ मार्चला कामकाज

Next
ठळक मुद्दे- पांझराकाठच्या रस्त्यांच्या कामाला स्थगितीची मागणी-राष्ट्रीय हरीत लवादमध्ये १४ मार्चला होणार कामकाज-प्रशासकीय यंत्रणांना हरीत लवादकडून नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून पांझरा नदीपात्राच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी साडेपाच किमीच्या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत़ या कामांना विरोध करीत शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी राष्ट्रीय हरीत लवादमध्ये याचिका दाखल केली असून त्याप्रकरणी १४ मार्चला कामकाज होणार आहे़ त्यानुषंगाने विविध विभागांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत़
शहरातील पांझरा नदीकाठच्या दोन्ही बाजूस सुरू असलेल्या रस्त्यांची कामे बेकायदेशिर असून त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचे स्पष्ट करीत शिवेसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली येथे याचिका दाखल केली आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागासह पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी (धुळे), महानगरपालिका (धुळे), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, मुख्य सचिव (राज्य शासन), नगरविकास विभाग, राज्य जैवविविधता मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे़ परदेशी यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार राष्ट्रीय हरीत लवादने सर्व प्रतिवादी यंत्रणांना नोटीस बजाविली असून १४ मार्चला सकाळी १०़३० वाजता याप्रकरणी कामकाज होणार आहे़ पांझरा नदीकाठच्या रस्त्यांची कामे त्वरीत थांबविण्यात यावीत, अशी प्रमुख मागणी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी केली आहे़ त्यामुळे रस्त्यांच्या कामांना स्थगिती मिळते का? याकडे धुळेकरांचे लक्ष असणार आहे़

 

Web Title: Work on 14th March of the Harish Arbitration on the roads of Dhanya Panjhra river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.