धुळ्यातील एकवीरादेवी मंदिरात कुमारिकांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 11:38 AM2019-10-04T11:38:14+5:302019-10-04T11:38:35+5:30
मारवाडी महिला मंडळातर्फे ललित पंचमीनिमित्त आयोजन, महाप्रसादाचे वाटप
आॅनलाइन लोकमत
धुळे : खान्देशची कुलस्वामिनी माता एकवीरादेवी मंदिरात गुरूवारी पाचव्या माळेला सकाळी १० वाजता १०१ कुमारिकांचे पूजन करण्यात आले. मारवाडी युवा मंच मिडटाऊन शाखा धुळे याच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुमारिका पुजनाचे १२ वे वर्ष होते.
अशी आहे आख्यायिका
गुरूवारी पाचवी माळ व ललीत पंचमी होती. या दिवशी आदिशक्तीला बाल्य रूपात पाहिले जाते. त्यामुळे २ ते ९ वर्षाआतील कुमारिकांचे पूजन करण्याची परंपरा आहे.
हा उपक्रम शहरातील मारवाडी महिला मंडळातर्फे गेल्या ११ वर्षांपासून राबवित आहे. यावेळी मारवाडी मंचच्या अरूणा भराडीया, संस्थापक अध्यक्षा सुमन पसारी, अध्यक्षा पायल अग्रवाल, सचिव हर्षदा जैन, भारती सिंघानिया, उमा अग्रवाल, काश्मिरा कुचेरिया, निता पसारी, वर्षा अग्रवाल, अनुजा गोरे, सीता अग्रवाल, नुपूर अग्रवाल, छाया धुप्पड आदी उपस्थित होत्या.
महाप्रसादाचे वाटप
पूजन झाल्यानंतर मंदिरात उपस्थित १०१ कुमारिकांना साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वाटण्यात आला. या वेळी आरती झाली. कार्यक्रमाप्रसंगी श्रीएकवीरा देवी व रेणुका माता मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते.
गर्दीने फुलतोय मंदिर परिसर
नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून मंदिरात पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. रोज सकाळी पहाटे पाच, सकाळी ८ , दुपारी १२ व सायंकाळी ७ वाजता भगवतीची आरती करण्यात येत असते. या आरतीच्यावेळीही भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होऊ लागली आहे.