धुळे : देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी संसदीय लोकशाही कार्यप्रणाली समजून घेऊन युवकांनी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन युवक बिरादरीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री क्रांती शहा यांनी येथे केले.येथील झेड.बी.पाटील महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळ व युवक बिरादरी भारत यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवा संसदीय नेतृत्व व आर्थिक साक्षरता’कार्यशाळेच्या उद्घाटन ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे होते. व्यासपीठावर उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील, सुरज पोळ, संयोजक डॉ.सुरेन्द्र मोरे, युवक प्रसन्ना पाटील, भैय्या पाटील, राजीव भैय्या सोनवणे उपस्थित होते.क्रांती शहा पुढे म्हणाले की भारत एक वैभवशाली देश राहावा म्हणून विचारवंतांनी युवकांशी वैचारिक संवाद साधणे गरजेचे आहे. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून युवकांनी राजकारण तसेच समाजकारणात सक्रीय झाले पाहिजे.समाजातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्वस्तरातून संघटीत प्रयत्न झाले पाहिजेत. समाजात राष्ट्रप्रेम, शांतता, बंधुभाव तसेच सामाजिक सलोखा वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहेत. युवकांनी सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय कौशल्य संपादन करत स्वत:चा उद्योग सुरू करुन परिवार तसेच देशाच्या विकासात हातभार लावावा. सुरज पोळ म्हणाले की जगात तुलनेने भारतात क्रियाशील नेतृत्व आहे, राजकारणाविषयी समाजात गैरसमज जास्त आहेत, आज देशाला युवा व सुशिक्षित नेतृत्वाची गरज आहे.त्यासाठी तरुणांनी संसदीय कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास करुन राजकारणात तसेच समाजिक कार्यात नेतृत्व करण्यासाठी सदैव सक्रीय राहिले पाहिजे.पप्राचार्य डॉ.चुडामण पगारे म्हणाले की विद्यार्थ्यांनी समाजातील विविध क्षेत्रातील समस्या तसेच होणारे बदल याविषयी माहीत करुन घेऊन समाज विकासात आपले योगदान दिले पाहिजे. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
युवकांनी नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:03 PM