धुळे : धुळवड की डोलचीतील पाण्याचा सपका आणि पाण्याने भरलेल्या फुग्याचा फटका हे दोन्ही गोष्टी अंगावर शहारे आणणऱ्या आहेत. या दोन गोष्टी नसल्यातर धुळ्याच्या धुळवडीची मजाच येणार नाही. परंतु काळानुरुप या दोन्ही गोष्टी सोबतच आता चौका - चौकात डी जे च्या तालावर शॉवरचा मज्जा युवक घेतांना दिसले.धुळवड म्हटली की धुळे शहरात अघोषित संचारबंदी असते. शहरातील प्रमुख बाजारपेठेसह सर्वच दुकाने बंद असतात. कारण धुळवडीच्या दिवशी शहरातून तुम्ही चांगल्या कपडयात फिरुच शकत नाही. असा व्यक्ती जर दिसला तर त्याला रंगवून त्याला पाण्याचे सपके देऊन ओला केल्याशिवाय शहरात चौका चौकात धुळवड खेळण्यासाठी उभे असलेल्या युवकांना चैन पडत नाही. त्यामुळे कोणीही धुळवडीच्या दिवशी घराबाहेर निघण्याचे टाळतात.पूर्वी शहरातील विविध व्यायामशाळेतर्फे बैलगाडी काढल्या जायच्या. बैलगाडीला दोन्ही बाजूने केळीचे खांब बांधलेले असायचे. बैलगाडीवर दोन पाण्याने भरलेले ड्रम ठेवलेले असायचे. व्यायामशाळेचे फलक लावलेले असायचे. सोबत दोन ते चार युवक पिचकारी व डोलची घेऊन उभे असायचे. बैलगाडी शहरातील प्रत्येक चौकातून फिरायची. यावेळी चौका - चौकात त्या बैलगाडीवर उभ्या युवकांना चारी बाजुने पाण्याचे फटके बसायचे. ते युवक सुद्धा बैलगाडीवर ठेवलेल्या ड्रममधील पाण्याचा मारा डोलची व पिचकारीने खाली उभ्या असलेल्या युवकांवर करायचे. आणि हे सुरु असतांना बैलगाडी चालविणारा युवक त्यातून मार्ग काढीत पुढे जायचे.आता बैलगाडयाही बंद झाल्या आहेत. धुळवड साजरी करण्याच्या पद्धतीतही बदल होत आहे. ढोलची सोबतच आता चौका चौकात शॉवर बसविले आहेत. शॉवरचा आनंद घेत युवक डी.जे.च्या तालावर नाचताना दिसून आले. शहरातील सहावी गल्ली, आग्रारोडवर गांधी चौक, खंडेराव बाजार आदी ठिकाणी शॉवर लावलेले आहे.बाजारात कृत्रिम रंगाच्याऐजजी नैसगिक हर्बल रंग विकण्यासाठी ठेवण्यात आलेले आहे़ हा हर्बल रंग १२० रूपयांनी बाजारात उपलब्ध होते. बाजारात १० ते २० रूपये पॅकिंगप्रमाणे रंगाची विक्री मोठ्या प्रमाणात दिवसभरापासुन सुरू होती़सांस्कृतिक मंडळातर्फें कार्यक्रमशहरात बच्चे मंडळींनी दोन दिवसापासुन धुळवडीचा आनंद लुटण्यास सुरुवात केल्याचे चित्र होते. एकमेकांना रंग लावून तसेच पाण्याचा मारा करुन बच्चे मंडळी सणाचा आनंद घेतांना दिसत होते़खंडेराव बाजार आंनदोत्सवजुन्या आग्रारोडवर खंडेराव बाजार व एकनाथ विजय व्यायाम शाळा यांनी रंग खेळण्यासाठी केलेल्या मंडपात रंग खेळण्यासाठी विविध वयोगटातील स्त्री-पुरुष मोठ्यासंख्येने उपस्थित होते. मंडळात बॅनर, पताके लावण्यात आले आहेत. दरम्यान, रंगाममुळे चांगले कपडे खराब होऊ नयेत म्हणून नागरिक जुने कपडे वापरण्यावर भर दिला होता़सायकल रॅलीतुन जनजागृतीमहाराणा प्रताप विद्यालयातील हरित सेनेतर्फे सायकल रॅली काढून इको फें्रडली होळीचा संदेश देण्यात आला़ यावेळी राष्ट्रीय हरीत सेना व निसर्ग मित्र समितीतर्फे शाळकरी विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली होती़ या अभियानात महाराणा प्रताप हायस्कूलसह परिसरातील सायकल रॅलीचे निर्सग मित्र समितीचे संघटक किशोर डियालानी यांनी हिरवी झेंडी दाखवली़पाणी वाचविण्याचे आवाहनराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी गुरूवारी इको फे्रंडली होळी केली़ यंदाच्या दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना पाण्याची बचत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
तरुणांची कलरफूल धुळवड....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:33 PM