पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन कोणी पाहिले का? अद्याप तरी कुठे दिसले नाहीत. परंतु सूडाचे राजकारण नक्कीच पाहायला मिळत आहे. अटलबिहारी वाजपेयी हे विरोधी पक्षात असताना कॉँग्रेसकडून त्यांना मिळणारा सन्मान आठवा. आंतरराष्टÑीय व्यासपीठावर देशाचे नेतृत्व करण्यासाठी विरोधी पक्षनेत्याला सन्मानपूर्वक पाठविण्याची कुवत ही काँग्रेसमध्ये होती. श्यामा प्रसाद मुखर्जी असो वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील क्षमता, विद्वत्तेची अभिमानास्पद नोंद कॉँग्रेसने वेळोवेळी घेतल्याचे जगाने पाहिले आहे. केवळ निवडणुकीपुरते राजकारण असण्यावर कॉँग्रेसचा भर होता. परंतु २०१४ पासूनचे चित्र पालटले. मित्रों किंवा भाईयों और बहनो...‘ऐसा होना चाहिये की नहीं होना चाहिये, वैसा होना चाहिये की नहीं होना चाहिये’ हेच शब्द कानावर यायला लागले आहेत. लोकांनाही आता या शब्दांचा वीट येतो. माणसांची मने जोडण्याचे सोडून प्रत्येकाला आधारला जोडत बसलेल्या या सरकारने ‘धर्म आणि जातीं’मध्ये सलोखा निर्माण करण्याकडे लक्ष दिले असते तर या सरकारच्या पारड्यात थोडे पुण्य जमा झाले असते. परंतु यांच्यातील ‘होम- हवन आणि यज्ञ’ या अंधश्रद्ध मानसिकतेने जोर धरला आहे. दिल्लीचा एक खासदार महेश गिरी देशापुढील संकटे दूर व्हावीत म्हणून घराघरातून तूप गोळा करून यज्ञ करण्याच्या तयारीत आहे. तर सत्यपाल सिंग या माजी आयएएस अधिकारी आणि विद्यमान केंद्रीय मंत्र्याचा कान पकडण्याची वेळ मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांवर येते. काल २६ जानेवारीला राजपथावर दिसलेला आधुनिक भारत अनुभवल्यानंतर गिरी आणि सत्यपालांची कीव करावीशी वाटते. देशाची लोकसंख्या १२५ कोटी असताना याच देशात ६०० कोटी मतदार भाजपला निवडून देतात. ज्याच्या तोंडात जे आले ते बोलून मोकळे व्हायचे आणि त्यावर जराही टीका करायची नाही. असे खूप काळ चालणारे नाही.शुक्रवारी राजपथावर झालेल्या कार्यक्रमात कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी हे सहाव्या रांगेत बसलेले दिसले. राहुल गांधी देशातील एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ते लोकसभेचे खासदार आहेत. परंतु त्यांना केवळ सूडाच्या राजकारणामुळे सहाव्या रांगेत आसन देण्यात आले. तर दुसरीकडे भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार अमित शहा यांना पहिल्या रांगेत बसविण्यात आले. दुसºयाला सन्मान देण्यासाठीही छाती (५६ इंची नव्हे) लागते. हा प्रकार देशाने पाहिला. भाजप याचा आसुरी आनंद घेतो आहे. कॉँग्रेसने याचे राजकारण न करता सहाव्या रांगेतील आसन सभ्यतेने स्वीकारले. राहुल गांधी संपूर्ण वेळ चित्ररथ आणि विविध दृश्यांना दिलखुलास दाद देत होते, आपण कुठे बसलो आहोत याची जराही चिंता त्यांच्या चेहºयावर दिसून येत नव्हती.-विकास झाडेब्युरो चीफ
हिच का ५६ इंच छाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 3:22 AM