'ओपन एआय' प्रणालीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी नवा धडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 09:15 AM2023-12-15T09:15:07+5:302023-12-15T09:15:30+5:30

एआय आणि तत्सम नवं तंत्रज्ञान भविष्यात आपल्यावर येऊन आदळणार आहे. आपल्या जीवनावर, रोजगाराच्या संधीवर ते निश्चित परिणाम करेल.

A new lesson for those studying 'Open AI' systems | 'ओपन एआय' प्रणालीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी नवा धडा!

'ओपन एआय' प्रणालीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी नवा धडा!

संजीव चांदोरकर, आर्थिक विषयांचे अभ्यासक

'ओपन एआय' या कॅलिफोर्नियामधील स्टार्टअप कंपनीमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी सॅम अल्टमन या मुख्याधिकाऱ्यास काढले, त्यानंतर अमेरिकेतील स्टार्टअप उद्योगात, कृत्रिम बुद्धिमता क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर अल्टमन यांना मायक्रोसॉफ्टने ऑफर देणे, ओपन एआयमधील ७५% संशोधक / कर्मचाऱ्यांनी राजीनामा देणे, ओपन एआयमधील गुंतवणूकदारांनी अल्टमन यांना पुन्हा मुख्याधिकारी म्हणूनच परत घेण्यास दबाव आणणे आणि शेवटी ज्या बोर्डाने अल्टमन यांना काढले, त्या बोर्डावरील अनेकांना स्वतःला राजीनामा देण्यास भाग पडून, अल्टमन पुन्हा कंपनीत सीईओ म्हणून सूत्रे हातात घेणे असे बरेच काही घडले.

 या घटनेत नाट्य तर होतेच; पण इतरही बरेच काही होते, त्याची हवी तशी चर्चा झाली नाही. बन्याच वेळा कंपनीमध्ये बोर्डरूम, सीईओ, बाहेरचे गुंतवणूकदार, त्या कंपनीचे स्पर्धक यांच्यात कंपनीवर कंट्रोल मिळवण्यासाठी असणारी सुप्त स्पर्धा तीव्र स्वरूप धारण करते. प्रत्येक कंपनीत त्याच तीव्रतेने असे होते असे काही नाही; पण अशा घटना अपवादात्मक नाहीत.

ओपन एआयमधील नाट्य फक्त कंपनीवर कोणाची हुकूमत चालणार एवढ्यापुरते मर्यादित नव्हते; तर त्याला काही मूल्यात्मक अंगदेखील आहे. एआय आणि तत्सम कटींग एज नवं तंत्रज्ञान आज ना उद्या आपल्यावर येऊन आदळणार आहे. आपली तयारी असो व नसो आपल्या जीवनावर, रोजगाराच्या संधीवर ते परिणाम करणार आहे हे नक्की, म्हणून त्याची किमान माहिती तरी ठेवली पाहिजे. 

 ओपन एआयची स्थापना २०१५ साली झाली. ओपन एआयच्या प्रवर्तकांच्या, ज्यात अल्टमनदेखील आहेत, काही मूल्यात्मक धारणा होत्या, या कंपनीच्या माध्यमातून जे तंत्रज्ञान विकसित होईल ते एक सार्वजनिक मत्ता, पब्लिक गुड म्हणून कोणालाही उपलब्ध करून देण्यात येईल; त्यामुळे अनेक क्षेत्रात सेवा सुधारण्यास मदत होईल, असा एक आदर्शवादी दृष्टीकोन त्यामागे होता. त्यातून या कंपनीची 'नॉन प्रॉफिट' म्हणून नोंदणी झाली.

कंपनी नॉन प्रॉफिट असली तरी संशोधनासाठी मोठा पैसा लागतो. भांडवल बाहेरून उभारण्याशिवाय पर्याय नव्हता; शिवाय भांडवल पुरवणारे स्वतः काही धर्मादाय हेतू घेऊन धंदा करत नव्हते. त्यांना आपल्या गुंतवणुकीतून नफा हवा होता. मग एक फॉर प्रॉफिट उपकंपनी स्थापन केली गेली. यात गुंतवणूकदार संस्थांनी भराभर भांडवल पुरवले, मायक्रोसॉफ्ट, टायगर, सिक्विया, विनोद खोसला इत्यादींना ओपन एआय तयार करत असलेल्या सॉफ्टवेअरचे मार्केट पोटेन्शियल जाणवू लागले त्याचे बाजारमूल्य ९० बिलियन डॉलर्स असू शकेल, असे अंदाज वर्तवले जाऊ लागले.

गुंतवणूकदारांमधील तथाकथित मूल्यात्मक पोझिशन्समध्ये संघर्ष सुरू झाला. सॅम अल्टमन हे सामाजिक कार्यापासून ढळले असून नफ्याच्या मागे लागले आहेत, असे आरोप होऊन त्यांना काढले गेले.

पब्लिक पर्पज' आणि कॉर्पोरेट भांडवलाच्या संघर्षात कॉर्पोरेट भांडवलाच्या लॉजिकची सरशी झाली. सॅम अल्टमन २४ तास काम करून एकट्याने थोडीच सॉफ्टवेअर तयार करणार होते? काम करणाऱ्या अनेक संशोधकांना स्टॉक ऑप्शन्समधून मिळणारे घसघशीत डॉलर्स हवे होते. त्यांनी जवळपास एकमुखाने अल्टमन यांना पाठिंबा देऊन बंड केले.

अजून दहा वर्षांनी मागे वळून बघताना ओपन एआयमध्ये जागतिक कॉपोरेट / वित्त भांडवलशाहीतील हा तथाकथित मूल्यात्मक संघर्ष एका झेंड्यासारखा दिसेल. नंतर जागतिक भांडवलशाहीतील नॉन प्रॉफिट, ईसीजी, सोशल इम्पॅक्ट या आधीच पोकळ असणाऱ्या शब्दांचा अजून खुळखुळा होईल. समाजासाठी बरेच जण काम करत असतात. जमिनीलगत गवत वाढते तशा अक्षरश: काही दशलक्ष मूल्यात्मक पोझिशन्समध्ये संघर्ष सुरू झाला. सॅम अल्टमन एनजीओ आहेत, त्यांना ना खते घालावी लागतात, ना पाणी; पण या उदात्त हेतूसाठी मोठा वृक्ष जोपासायचा म्हटला की, घसघशीत भांडवल लागणार, ज्ञानी माणसे लागणार, रेव्हिन्यू मॉडेल लागणार, व्यवस्थापन लागणार... त्यासाठी फक्त उदात्त हेतू कधीच पुरेसा नसतो, हा या सर्व घटनाक्रमांतला सर्वांत मोठा धडा।

Web Title: A new lesson for those studying 'Open AI' systems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.