भाष्य - मातृप्रेमाचे भरते

By admin | Published: January 13, 2017 12:17 AM2017-01-13T00:17:38+5:302017-01-13T00:17:38+5:30

भारतवर्षात मातृप्रेमाची मोठी परंपरा आहे. आईवडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून १४ वर्षे वनवास भोगणारे प्रभू श्रीराम यांचा आदर्श

Annotation - Mother's fills | भाष्य - मातृप्रेमाचे भरते

भाष्य - मातृप्रेमाचे भरते

Next

भारतवर्षात मातृप्रेमाची मोठी परंपरा आहे. आईवडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून १४ वर्षे वनवास भोगणारे प्रभू श्रीराम यांचा आदर्श आपल्यापुढे आहे. तर नेत्रहीन मात्यापित्यास कावडीत बसवून तीर्थयात्रेला जाणारा श्रावणबाळ सर्वांना परिचित आहे. मातृप्रेमाची चर्चा होते तेव्हा चित्रपटसृष्टीत आईच्या भूमिकेला प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व कुणी नाकारू शकत नाही. आईचा त्याग आणि तिच्या प्रेमाची अनेक रुपे या चित्रपटांमधून समाजापुढे वेळोवेळी आली. परंतु आईच्या बाबतीत सर्वाधिक गाजला तो ‘दिवार’ या हिंदी सिनेमातील संवाद. रव१च्या भूमिकेत असलेला शशिकपूर ‘मेरे पास माँ है’ असे मोठ्या अभिमानाने सांगत त्याचा भाऊ म्हणजेच अमिताभ बच्चन याचे गर्वहरण करतो तेव्हा प्रेक्षकांचा ऊर दाटून आल्याशिवाय राहात नाही. हा झाला सिनेमातील प्रसंग. सध्या आईच्या प्रेमावरून अशीच संवाद फेकाफेकी सुरु आहे. तीही राजकीय पटावर आणि मुलांच्या भूमिकेत आहेत साक्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. कुणाचे आपल्या आईवर अधिक प्रेम आहे हे सांगण्याचा अथवा दाखविण्याचा प्रयत्न या नेत्यांनी चालवला आहे. म्हणतात ना, राजकारणात दावे-प्रतिदावे आणि आश्वासनांचा बाजार कधी थांबत नाही. त्याचीच प्रचिती केजरीवाल यांच्या दाव्याने सर्वांना यावी. मोदींच्या तुलनेत मी माझ्या आईची अधिक काळजी घेतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचे झाले असे की, गुजरातच्या दौऱ्यावर असताना मोदी यांनी आपण नेहमीप्रमाणे योगासने न करता त्या वेळात आईच्या भेटीस गेलो, तिच्यासोबत नाश्ता केला. तिला भेटून फार आनंद झाला, असे टिष्ट्वट केले होते. तसे बघितल्यास यात नवल असे काहीच नव्हते. पण आजच्या सोशल मीडियाच्या युगात आणि राजकारणाच्या बदलत्या प्रवाहात अशा खासगी गोष्टी शेअर करणेही कधीकधी फायद्याचे ठरत असते. हे राजकीय नेत्यांपेक्षा कुणाला अधिक समजणार? मोदींची ही भावनाप्रधानता बघून त्यांच्यावर कायम टपून असलेले केजरीवाल शांत थोडीच बसणार होते. त्यांनीही लागलीच टिवटिवाट केला. ‘मी तर माझ्या आईसोबतच राहतो. रोज तिचा आशीर्वाद घेतो.पण याचा गाजावाजा करीत नाही’ असे टिष्ट्वट करून जणू काही मी तुमच्यापेक्षा आईवर अधिक प्रेम करतो, हेच सांगण्याचा प्रयत्न केला. केजरीवाल एवढ्यावरच थांबले नाहीत तर मी आपल्या आईला राजकीय लाभासाठी बँकेच्या रांगेत उभे करीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांनी पंतप्रधानांना हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीची आठवण करून देत आपल्या वयोवृद्ध आई व पत्नीला सोबत ठेवण्याचा सल्लाही देऊन टाकला. खरे तर आईवरील प्रेमाचे मोजमाप करणे अशक्यच. ‘प्रेमस्वरूप आई’ असे आईचे वर्णन कवीने केले आहे. त्या प्रेमाची जाहिरातबाजी हवी कशाला?

Web Title: Annotation - Mother's fills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.