भाष्य - आक्रीतच म्हणायचे

By admin | Published: January 13, 2017 12:16 AM2017-01-13T00:16:32+5:302017-01-13T00:16:32+5:30

वाघाच्या बच्च्यांना वाघिणीचे सुळे टोचत नाहीत आणि जखमादेखील करीत नाहीत, असे म्हणतात.

Annotation - Quietly speaking | भाष्य - आक्रीतच म्हणायचे

भाष्य - आक्रीतच म्हणायचे

Next

वाघाच्या बच्च्यांना वाघिणीचे सुळे टोचत नाहीत आणि जखमादेखील करीत नाहीत, असे म्हणतात. हे झाले बालपणाचे. पण बच्चा वाघाचा ढाण्या वाघ झाल्यावर तो भले इतरांच्या उरात धडकी भरवीत असेल पण त्याच्याच व्याघ्रकुळातील इतरांना त्याचे काय भय? पण मग असे असताना ज्याला सारे भिऊन आणि टरकून वागतात त्या ढाण्या वाघालाही जर एखाद्याचे भय किंवा भीती वाटत असेल तर अशी भीती निर्माण करणारा ‘लै मोठा डेंजर’ प्राणीच म्हणायचा. जंगलचा कानून काही ठाऊक नाही. म्हणजे तिथे वाघ सिंहाला घाबरतो, सिंह वाघाला घाबरतो की दोघे एकमेकाला घाबरतात हे काही ठाऊक नाही. पण माणसांच्या जंगलातील वाघाला सिंहाची आणि आख्खी त्याची नाही तर केवळ त्याच्या डरकाळीची भीती वाटते म्हणजे जरा आक्रीतच म्हणायचे. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राची बुलंद वगैरे की काय म्हणतात ती तोफ आणि या तोफेचा गोलंदाज म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख हा महाराष्ट्राचा ढाण्या वाघ! पण त्याच्या उरात म्हणे गुजरातचा सिंह म्हणविल्या जाणाऱ्याच्या केवळ ‘मित्रों’ या डरकाळी नव्हेच, तर साध्या ललकारीने धडकी भरते म्हटल्यावर या ढाण्या वाघाच्या कुणब्यातील मार्जार कुळातल्या बाकींच्यांची काय गत होत असेल याची केवळ कल्पना केलेलीच बरी. कुठल्याशा एका कार्यक्रमात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हणे वरील गौप्यस्फोट केला. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ‘मित्रों’ अशी साद घातली की तिची वाघापेक्षाही जास्ती भीती वाटते असे ते म्हणाले. खरे तर उद्धव ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष हा मोदींच्या अधिपत्याखालील भाजपाचा मित्र पक्ष. एक वाघोबा तर दुसरा सिंहोबा. दोघे एकाच वेळी दोन राज्यांवर राज्य करणारे. मग तरीही वाघोबाने असा डरपोकपणा का करावा बरे? कारण फार साधे आहे. सिंहोबाने मैत्री करार केला तेव्हांच बहुधा एक अट लादली असावी की शिकार करायची ती आम्हीच. ती आम्ही करु. तिच्यावर पहिला ताव आम्हीच मारु. त्यानंतर जे काही शिल्लक राहील, ते तुमचे. केन्द्रातील सरकारातले मंत्रिपद असो, महाराष्ट्रातील जागावाटप असो, की अन्य काही असो, आमचा नंबर पहिला. तेव्हां भीती वाटणारच. पण भानगड अशी की हे सारे सहन तर होत नाही पण सोडावे तर ते शक्य होत नाही. तेव्हां केवळ घाबरणे हेच हाती!

Web Title: Annotation - Quietly speaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.