कालचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:21 AM2018-04-24T03:21:22+5:302018-04-24T03:21:22+5:30

एकाच कुटुंबात जन्मलेल्या आणि समान वातावरणात वाढलेल्या लोकांचे जीवन पूर्णत: वेगवेगळे असते.

Clock cycle | कालचक्र

कालचक्र

googlenewsNext

प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी असते. म्हणूनच प्रत्येक मानवाच्या जीवनाचे फळ इतरांपेक्षा वेगळे असते. जीवनात एखाद्याला लवकर तर एखाद्याला उशिराने यश प्राप्त होते. प्रत्येकाचे आयुष्यमान वेगळे असते. एकाच कुटुंबात जन्मलेल्या आणि समान वातावरणात वाढलेल्या लोकांचे जीवन पूर्णत: वेगवेगळे असते. एखाद्याच्या जीवनात आनंद तर एखाद्याचे जीवन दु:खाने भरलेले असते. असे का होते, हे एक मोठे रहस्य आहे. या रहस्याला समजून घेण्यासाठी विश्वातील विचारवंतांनी खूप चिंतन केलेले आहे व आपआपले विचार मांडलेले आहेत. संस्कृत साहित्याचे प्रख्यात नाटककार भास यांनी सांगितलेले आहे-
कालक्र मेण जगत: परिवर्तमाना
चक्रारपङ्क्तिरिव गच्छति भाग्यपङ्क्ति:
म्हणजेच कालक्र मानुसार बदलणाऱ्या या विश्वातील भाग्यरेषा चक्र रेषेनुसार बदलत असतात. ज्याप्रमाणे चक्र खाली-वर होत असते, त्याप्रमाणे मानवाचे भाग्य सुध्दा वर-खाली होत असते. असे दिसून येते की समान प्रयत्न करणाºया दोन व्यक्तींना समान यश मिळत नाही. विश्वातील या रहस्यमय बाजूस तत्ववेत्त्यांनी कालचक्र असे संबोधले आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की मी काळ आहे, जो सर्वांना संचलित करतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. जेव्हा मानव कर्म करतो, तेव्हा त्याचे काही कर्म असे असतात, ज्याचे तात्काळ फळ मिळत नाही, तर ते कर्म निसर्गाच्या कुशीत साचलेले असतात व अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ते प्रकट होतात. या कर्मफळांचा प्रकट होण्याचा एक काळ असतो. पराकाष्ठेचे कर्म केल्यानंतरसुध्दा काही कर्मफळे तात्काळ प्रकट होत नाहीत. बºयाच वेळा असे दिसून येते की, खूप कमी कर्म केल्यानंतरही फळाची प्राप्ती लवकर होेते.
विचारवंतांच्या मते- कर्मफळांचे हे प्रकटीकरण कालचक्रानुसार होते. हे कालचक्र कसे काम करते हे एक मोठे रहस्यच आहे. कालचा राजा आज रंक व कालचा रंक आज राजा कसा बनतो, हे समजणे कठीण आहे. कालचक्रामध्ये बदल करणे खूप कठीण आहे. परंतु आपण कर्म व धैर्याने त्याचा सामना करू शकतो. सतत योग्य कर्माचे अनुपालन व परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य आपल्याला या कालचक्र ाच्या विळख्यातून वाचवू शकतात. योग्य वेळ, योग्य कर्माचे अधिष्ठान व कर्मफळास उशीर झाला तरीही धैर्याचे धारण, आपल्याला दृढ, मानिसक व शारीरिक स्वास्थ्य प्रदान करतात.

Web Title: Clock cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.